Summary of the Book
रत्नाकर मतकरी हे रहस्यकथा प्रकारातील एक सिद्धहस्त नांव. सत्य आणि कल्पनेची रसमिसळ होऊन त्यांच्या कथातून एक विलक्षण जग आकाराला येते. वाचकाला गुंतवून ठेवते. मतकरी यांचे हे पुस्तक आपल्याला अशाच इजा वेगळ्या विश्वात घेऊन जाते. त्यात गुढ आणि भय यांचे मिश्रण आहे. मतकरी यांच्या प्रभावी निवेदनशैली आणि नाट्यमयतेमुळे या कथा रंगमंच आणि दूरचित्रवाणीवरही तेवढ्याच ताकदीने सादर होताना दिसतात. पुस्तकातील एकूण १६ कथांमधून एक वेगळा जीवनानुभव मिळतो. अतिमानुषाच्या कथाही अखेर मानवी प्रश्नांचीच संबंधित असतात; त्यामुळेच त्या खऱ्याखुऱ्या वाटतात, असे त्यातून स्पष्ट होते.