Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/
$
2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
वपु काळे ह्यांचे कादंबरीलेखन मोजकेच आहे. त्यातील ही त्यांची पहिलीच कादंबरी. जिच्याभोवती हे लेखन झाले आहे तिच्या तडक, ठाम निर्णयामुळे आणि तिच्या एकाकी झुंजीमुळे हे लेखन प्रथम जेव्हा वाचकांपुढे आले तेव्हांच त्याने वाचकांच्या मनाचा ठाव घेतला होता. लेखनातला तो ताजेपणा अजूनही टिकून आहे म्हणूनच जग वेगाने बदलत असले तरी हे लेखन अजूनही तितक्याच उत्कटतेने वाचावेसे वाटते आणि ते वाचकाला तितकेच अजूनही धरून ठेवते. बाबीचे निर्धाराने आल्या प्रसंगाला सामोरे जाणे आणि अखेर आपलाच दाम खोटा निघाल्याचे बघून घायाळ होणे - हे वाचकालाही तितकेच घायाळ करणारे आहे - वपुंच्या लेखनाचा हा एक वेगळाच पैलू आहे. त्याने वाचकाला स्तंभित केले आहे.
ही वाट एकटीची ही कथा फक्त बाबी या नायकेसाठी मर्यादित नाही तर अश्या असंख्य स्त्रिया आपल्या आवतीबवती आहेत & या खोट्या समाजाशी लढत आहेत. आपण मात्र अजून आंधळे सारखं जगत आहो या पुरुषप्रधान समाजात. खास करून प्रत्येक तरुण -तरुणीने हे पुस्तकं आयुष्यात महत्वाचं पाऊल उचलण्या पूर्वी जरूर वाचावे & पुढे बाबीच्यात विचाराने जीवन जगावे.
Rupesh Bidkar
07 Jul 2023 05 57 PM
Hi kadambri mi sadhya vachli ahe.. mazya manala khup bhavali, tyavrun mi kahi navin lihiyacha praytn kela ahe... babi la jar mi bhetlo tar ky bolel ??
https://www.onecuriousguide.com/hi-vaat-ekatichi/
Sham sidam
15 Aug 2020 09 02 AM
Wahhh!
Shantanu Acharya
09 Jul 2017 08 34 PM
Nakki Nakki wacha....Babi chi samajashi aani swakiya shi ladhayee nakki wacha....Hats off!!! Grand salute !! VaPu ji na ...faar purogami vichar parkhadpane pahilya kadambarit mandne...hats off....
Rupesh Mayekar
24 Aug 2016 06 41 PM
....शेवट पर्यंत वाचकांना खिळवून ठेवणारी कादंबरी... हि वपुंची... १ ली कादंबरी पुस्तक रुपी वाचाण्याचे भाग्य लाभले. त्यासाठी "BookGanga" चे आभार आणि वपूं साठी तर शब्दच नाहीत...
Supriya Ghude
15 Jul 2014 02 06 PM
'बाबी' - एक विलक्षण, धाडसी, सत्याची कास न सोडणारी मुलगी. आपल्या समाजात अशा अनेक 'बाबी' आहेत, तिचा स्वतः च्याच आयुष्याशी असलेला 'एकटी' चा लढा मांडलाय या पुस्तकात.
व. पु. च लेखन नेहमीच मध्यम वर्गीयांचा मनाला हात घालणारच असत. त्यांचा कथेचा शेवट कधीच typical movie style - Happy Ending असलेला कधीच नाही मिळणार. त्यांचा कथेमध्ये नेहमीच practical approach दिसतो.
तोच practical approach 'बाबी' च्या कथेतही दिसून येईल.
छान पुस्तक. खिळवून ठेवत.
Rahul Gholap
20 Apr 2014 03 54 PM
हे पुस्तक खरेच अप्रत्रीम आहे. बाबी कडून बरेच काही शिखन्या सारखे आहे. आज प्रत्येक मुलीने हि कादंबरी वाचली पाहिजे. खूप चांगले विचार मांडले आहेत वपू काळेनि.
मयूर देवकर
22 May 2012 05 01 PM
खरोखरच वाचकाला घायाळ करणारी कादंबरी आहे...बाबी चा निग्रही स्वभाव आणि आपला मुलगा सुद्धा खोटा निघाला असताना पुन्हा ती ज्या निग्रहाने निर्णय घेते खरच शेवटी स्तंभित होतो आपण... व.पु. इज ग्रेट..