Summary of the Book
हिंदू धर्मातील अनेक प्रथा परंपरांची आपल्याला माहिती असते; पण त्यामागचे शास्त्र माहित नसते.
आन्हिक, आराधना, व्रतवैकल्ये व संस्कार ही हिंदूधर्माची चतु:सूत्री आहे. त्याची सर्वांनाकिमान माहिती
असावी, या भावनेतून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
शास्त्रोक्त स्नानविधी, गौणस्नान, आचमन, प्राणायम, भस्म, तिलकधारण, संकल्प, संध्या, नित्यपूजा, शास्त्रोक्त भोजनविधि,
प्रदक्षिणा, निर्माल्य, नैवेद्य,जागृत दैवत, आरती,नमस्कार, देवघर, व्रतवैकल्य, सण, संस्कार, अपत्यजन्म, मुला-मुलींच्या
नावांची शास्त्रोक्त पद्धतीने निवड, श्राद्ध, गृहकलह, तीर्थयात्रा, आदींमागचे शास्त्र या पुस्तकातून समजते. या संकल्पनांचीखुलासेवार
माहिती आणि त्या संदर्भात उद्भवणाऱ्या शंकांचे निरसनही केले आहे..
नित्य आन्हिक, नित्य - नैमित्तिक आराधना, व्रतवैकल्ये, संस्कार, अंत्येष्टी, अशौच, श्राद्ध तसेच दैनंदिन प्रापंचिक राहाटी ह्या प्रांतांत
उद्भवणा-या शंका-समस्यांचे विविध सामाजिक स्तरांवरून समाधानकारक निराकरण करणारा; सर्वाधिक खपाचा बहुमान प्राप्त झालेला;
अवडंबर टाळून कमीत कमी पण अत्यावश्यक धर्मपालन कसे करावे ह्याबाबत मार्गदर्शक ठरल्यामुळे प्रत्येक हिंदू व्यक्तीस
आपलासा वाटणारा बहुमोल ग्रंथ.