Summary of the Book
नोंदणी व मुद्रांक खात्याच्या कामकाजाविषयी "दस्तावेज नोंदताना " या कविता संग्रहाचे अवलोकन केले असता , सदराच्या कविता संग्रहात सामान्य माणसालासुद्धा सहज व सोप्या भाषेत समजेल अशारितीने नोंदणी व मुद्रांक कायद्याविषयी विवेचन केल्याचे दिसून येते. सदर कविता संग्रह हा सामान्य माणसाला तर मार्गदर्शक आहेच त्याचबरोबर नोंदणी खात्यात काम करणाऱ्या कर्मचार्यांनादेखिल प्रबोधनात्मक असल्याचे दिसून येते . श्री. धनराज खरटमल, सह दुय्यम निबंधक, मुंबई शहर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!!!