Hard Copy Price:
25% OFF R 170R 127
/ $
1.63
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
पर्यावरण हा विषय सध्या सतत चर्चेत आहे. निसर्गसंपदेने नटलेल्या आपल्या पृथ्वीवर सध्या निसर्गाचा ऱ्हास होत आहे. मानवाचे अस्तित्व निसर्गावरच अवलंबून असल्याने जंगल, त्यातील पशु - पक्षी वाचविण्यासाठी जनजागृती केली जात आहे. जंगलातील या रहिवाशांची माहिती देऊन त्यांच्यापुढील अडचणी काय आहेत, हे सुजाता आ. लेले यांनी 'करूया मैत्री निसर्गाशी' यातून सांगितले आहे. निसर्ग कसा अनुभवायचा हे सांगताना त्यांनी प्रत्येक ऋतूमधील निसर्गाची रूपे उलगडून दाखविली आहेत.
आटपाट म्हणजे रुंद व लांब जंगलातील निसर्ग यात दिसतो. आपली आरंभदेवता म्हणजेच गणशे याचे मुख असलेल्या गजरांच्या गोष्टीने कहाणीला सुरवात होते. मग जंगलाचा राजा सिंह, वाघ, चित्त, बिबट्या यांची ओळख होते. मांसाहारी, शाकाहारी,जलचर व उभयचर, बिळातील प्राणी आपली कथा व व्यथा आपल्यासमोर मांडतात.
यानंतर आटपाट जंगलातील पक्षी, पाळीव प्राणी यांचा क्रम आहे. पशुपक्षी व मानवाच्या कल्याणासाठी निसर्ग रक्षण आवश्यक आहे. हा संदेश या सर्वांच्या निवेदनातून मिळतो.