Hard Copy Price:
R 120
/ $
1.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
राजेन्द्र बनहट्टी कोणतीही झापडं न लावता एका स्वच्छ, नितळ दृष्टीनं जीवनाकडे पाहातात. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्या शोधासाठी त्याचं होणारं चिंतन त्यांच्या लेखनात सहजपणे उमटतं. विशेष म्हणजे हे सारं त्या त्या कथनाचा भाग म्हणूनच येतं. विषयानुरूप, व्यक्तीनुरूप, प्रसंगानुरूप. वाचकाला अंतर्मुख करणारं जीवनभाष्य राजेन्द्र बनहट्टी ज्या सोपेपणानं करतात, ते थक्क करणारं आहे. मनोविश्लेषण करताना किंवा मनाचा शोध घेताना त्यांची कथा थांबत नाही. तिची गती कायम राहते. त्यांच्या व्यक्तिरेखांच्या मनातील भाव, विचार, विकार, अस्वस्थता, समाधान या सार्या गोष्टी ते त्या त्या व्यक्तीच्या कृतीमधूनच समर्थपणे दाखवतात.
‘हंस’ मासिकाचे साक्षेपी संपादक आनंद अंतरकर यांच्या शब्दांत सांगायचे, तर राजेन्द्र बनहट्टी यांची कथा ही मराठी कथेच्या वटवृक्षाची एक अत्यंत रसरशीत, डौलदार शाखा आहे.