जपान म्हणजे उगवत्या सूर्याचा देश, जपान म्हणजे तंत्रज्ञान, अतिप्रगत देश, असे चित्र उभे राहते. अनेक भारतीयांना जपानचे आकर्षण असते. मुकुंद नारायण लेले यांनी कुतूहलापोटी जपानला दोन वेळा भेट देऊन पर्यटनासाठी होकायडो आणि होन्शू बेटांची निवड केली. तेथील निसर्ग, संस्कृती, परंपरा आणि मुख्य म्हणजे आदरातिथ्य अनुभवले. हे अनुभव त्यांनी 'मी पाहिलेला जपान' मधून सांगितले आहेत. विमानतळावर उतरल्यापासून जाणवणारी स्वच्छता, जागोजागी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर, मोटारींऐवजी सायकलींचा वापर, पायी चालण्याची सवय, जपानी नागरिकांचे आदरातिथ्य, कल्पकता व सुबकता, नीटनेटकेपणा, स्वयंशिस्त, वक्तशीरपणा, काटेकोरपणा आदींचे वर्णन यात केले आहे. फुरानो, शोकातान पेनिन्सुला, ओटारु, लेक तोया, माउंट ऊसु, नोबोरीबेत्सु या होकायडा बेटांवरील पर्यटनस्थळांविषयी माहिती दिली आहे. होन्शू बेटांविषयी सांगताना जपानच्या इतिहासातील आढावा घेतला आहे. शिंटो व बौद्ध धर्म, जपानमधील रेल्वे, टोयोटो कैकान म्युझियम, निशिकी मार्केट, जिंकाकु जी, गैशा पद्धत आदी रंजक व माहितीपूर्ण लेखन यात आहे.
‘मी पाहिलेला जपान’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5193360237891107102