Summary of the Book
इंग्रजी वृत्तपत्रे, साप्ताहिके आणि मासिके वाचल्यानंतर त्यातले नवे असलेले इंग्रजी शब्द आणी आशयसंपन्न मजकूर वहीमध्ये उतरवून ठेवण्याच्या एन. डी. आपटे यांच्या सवयीमुळे सामान्य ज्ञानाचा खजिना त्यांच्या चौफेर या पुस्तकातुन वाचकला मिळतो. त्यांच्या या पुस्तकात १८ प्रकरणांत ६ भागांत त्यांनी अतिशय रंजक माहिती दिली आहे. आधुनिक सुवचनात त्यांनी ४० विचार घेतले आहेत, तीन विभूती, निवडक पुरुष, महिला आणि खेळाडू यांचे व्यक्तीदर्शन, थोर लोकांचे विचारदर्शन, पैसा-गुंतवणूक, पत्रकार, मूलतत्वे, नव्या कल्पना, उद्बोधक गोष्टी, मनोरंजक कथा, म्हणी यांची माहिती आहे. १९९४ पासून २०११ पर्यंत १७ वर्षांत त्यानी लेखनाच्या विविध क्षेत्रांतून निवडलेले साहित्य सुबोध मराठी भाषांतरासह या पुस्तकात दिले आहे. वृत्तपत्रविद्या आणि इंग्रजी भाषा यांचा अभ्यास करणाऱ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे.