Summary of the Book
आपली त्वचा आणि केस वयाबरोबर आजारी पडतात, असे म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्वचेच्या किंवा केसांच्या वेगवेगळ्या समस्या उभ्या राहतात. त्वचेला सुरकुत्या पडतात आणि केस पांढरे होतात, गळू लागतात. अलीकडे अशा समस्या तरुण वयातही येताना दिसतात. मनीषा कोंडप यांनी त्यांच्या पुस्तकात केसांची निगा कशी राखावी, याविषयी मार्गदर्शन केले आहे.
केसांसाठी तेले, हेअरडाय, मेंदी, शांपू, कंडिशनर, पोषक आहार व योगासने यांची माहिती दिली आहे. एवढेच नव्हे, तर केशरचनाही सांगितल्या आहेत. डॉ. छाया कुलकर्णी यांनी फेशियल या पुस्तकात फेशियल कसे करावे, त्यासाठी लागणारे साहित्य, लेप व तेले, चेहऱ्याच्या मसाजाची पद्धत, फेशियलचे २० प्रकार दिले आहेत. फेशियलसाठी फळांचा वापर कसा करावा, याची माहितीही दिली आहे.