Summary of the Book
कम्युटरवरील कोरल ड्रो या प्रोग्रॅमचा साह्याने कोणत्याही प्रकारचे डिझाइन अथवा ड्रॉइंग करता येते. त्यामुळे हा प्रोग्रॅम प्रामुख्याने मुद्रक, चित्रकार, कलाकार वेबडिझायनर यांच्यासाठी उपयुक्त आहे. या पुस्तकात नरेंद्र आठवले आणि सुजाता आठवले यांनी कोरल ड्रो या विषयीची इथ्यंभूत माहिती दिली आहे. प्रथामील माहिती दिल्यावर दुसरे प्रकरण पेज ले - आउट कसा करावा, या विषयावर आधारलेले आहे.
कलर आणि ग्रीड यांचा वापर या प्रोग्रॅममध्ये महत्वाचा ठरतो. प्रारंभी बेसिक टूल्सची माहिती करून घेऊन त्याचा सराव करावा लागतो. लाइन टूल, टेक्स्ट टूल, शॉपिंग टूल्स यांचा उपयोग कसा करावा याची माहितीही मिळते. रंग हा प्रोग्रॅमचा आत्मा आहेत. या द्रुष्टीने त्याच्या विविध बाजू समजतात. मग येतात ते इफेक्टस, डिजिटल इमेज, बीटमॅप इफेक्टस आणि अखेरीस प्रिंटींग.