Summary of the Book
हे म्हटलं तर एका माणसाचं मानसिक चरित्र आहे. हे म्हटलं तर एका माणसाचं व्यावहारिक चरित्र आहे. हे म्हटलं तर संपूर्ण समाजाचं चरित्र आहे. हे म्हटलं तर एका काळाचं चरित्र आहे.
आयुष्याचे सगळ्याचे सगळे संदर्भ आणि आशय निखळ शब्दांत टिपत जन्माला आलेली हि कविता आहे. एक व्यक्ती आणि एक काळ यांच्या जगण्याचा विविधरंगी अवकाश शब्दांत घेऊन एखाद्या भव्य कादंबरी सारखा हा कविता संग्रह वाचता येतो.