Summary of the Book
ही दोन्ही पुस्तके शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पुस्तक वाचनास उपयुक्त आहेत. वरील पुस्तकात वात्सल्यरसपूर्ण सुप्रसिद्ध लघुकथांचा संग्रह आहे. पुन:भेटीच्या सात खंडातून आई-आजी-मुले-वडील यांची समता आणि स्नेह दर्शविणार्या कथा संग्रहित केल्या आहेत. कुटुंबातील अनेक मूक सुखदु:खाची जाणीव तरुण पिढीला प्रस्तुत कथा ह्या पुस्तकातून करुन देतील. पुस्तकाच्या शेवटी अभ्यास व प्रश्न दिले आहेत. कथेतील भागाचा अभ्यास पडताळून पाहण्यास व विचाराना चालना देण्यास उपयोगी पडतील.