Summary of the Book
लहानपणापासून चांगले संस्कार होणे, ही आयुष्याची मोठी शिदोरी असते. बालपणी घरातून असे संस्कार पालक करतात. शाळेत विद्यार्थ्यांमध्ये नीतीमूल्यांची रुजवणूक व्हावी त्यांचा भावनिक, बौद्धिक, शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासासाठी त्यांना विविध प्रकारचे ज्ञान, माहिती दिली जाते. त्यांचे अनुभवविश्व समृद्ध होण्यासाठी दीपक मगर यांनी 'संस्कारदीप'मधून राष्ट्र, भक्ती, क्रीडा, आरोग्य, सण, उत्सव अशा विविध क्षेत्रांची माहिती दिली आहे. भारताचा नकाशा, संविधानम राष्ट्रगीत, महाराष्ट्र, श्लोक, आरत्या, मंत्र, प्रार्थना, भावगीते, सुविचार, बोधकथा, दिनविशेष, दिग्गजांची निवडक पत्रे, योगाभ्यास, क्रीडांगणे, भारतीय शास्त्रज्ञ, शिक्षण, प्रथमोपचार आदी १५ विभागांत दिलेली माहीती उद्बोधक आहे. या संकलित माहितीमुळे एकाच वेळी अनेक विषयांचे ज्ञान मिळते.