Home
>
Books
>
सामाजिक
>
Dharmabaddal Mansala Mansashi Jodato To Dharm Ani Todato To Adharm - धर्माबद्दल माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म आणि तोडतो तो अधर्म
Hard Copy Price:
R 200
/ $
2.56
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
'समाजवादी ना? मग ते धर्म नाकारणारच!' अशी एक सर्वसामान्य समजूत असते. डॉ. कुमार सप्तर्षी समाजवादी आहेत ते धर्म नाकारत नाहीत. 'माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म आणि तोडतो तो अधर्म' अशी धर्माची व्याख्या करतात. जातिभेद, आर्थिक-सामाजिक विषमता यांच्याकडे ज्या चिकित्सक विश्लेषक नजरेने ते बघतात, त्याच दृष्टीने धर्माचे अवलोकन करतात. धर्माची चांगली बाजू, धर्मात शिरलेला अधर्म, धर्माचा राजकारणासाठी होणारा वापर इत्यादींची परखड मांडणी 'धर्माबद्दल' या पुस्तकात त्यांनी केली आहे. हिमालय भ्रमण, शंकराचार्यांशी झालेला वाद, दलाई लामा, पांडुरंगशास्त्री आठवले, विपश्यना यांचे कार्य हाताचे काही न राखता ते इथे मांडतात.
सत्याग्रही आंदोलनाचा मार्ग वापरून युवकांचे अनेक प्रश्न १९७० ते ८० या दशकात डॉ. कुमार सप्तर्षी यांनी 'तुक्रांद' मार्फत सोडवून दाखवले. आणीबाणीत पूर्ण काळ ते भूमिगत आणि तुरुंगात होते. नंतर आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. सध्या ते 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी'चे अध्यक्ष, 'सत्याग्रही' मासिकाचे संपादक अशा जबाबदार्या सांभाळतात. 'यात्री,' येरवडा विद्यापीठातील दिवस,' 'सत्तातुराणाम,' 'संकल्प,' 'स्वप्नांच्या सापळ्यांचा देश : अमेरिका' या ग्रंथातून त्यांची राजकीय-सामाजिक भूमिका स्पष्ट होते. 'धर्माबद्दल'मधील त्यांचे लेख 'सनातनी' आणि 'पुरोगामी' अशा दोघांनाही आवडतील, दिशा दाखवतील.