आर्टिफिशियल इंटेलिजन्स + प्रवास + सजीव
Pages: 1440
Weight: 1350 Gm
Binding: Paperback

Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 1000 R 750 / $ 10.71
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
आर्टिफिशियल इंटेलिजन्स
१९५० च्या दशकांपासून बघितलं गेलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं स्वप्न अनेक खाच खळगे पार करत मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, नॅचरल लँग्वेज अशा अनेक तंत्रज्ञानांच्या मदतीनं आता पूर्णत्वास येतंय. कला क्षेत्रासकट सगळ्या क्षेत्रात धुमाकूळ घालायला ते आता सज्ज झालंय. या कल्पनेमागचा इतिहास, वेगवेगळ्या तंत्रज्ञानांची ओळख, त्याचे उपयोग, त्याचे भविष्यात होणारे विपरीत परिणाम, UBI या सगळ्याचा वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ !

अच्युत गोडबोले आपल्या काळातले वेगवेगळ्या विषयांमधले सगळ्यात विपुल लेखन करणारे लेखक आहेत. त्यांनी AI च्या इतिहासावरून हळूवारपणे जात असताना सद्यपरिस्थितीचा उहापोह करत या पुस्कात AI च्या भविष्याची अतिशय कल्पक मांडणी केली आहे. हे पुस्तक जितकं माहितीपूर्ण आहे तितकंच ते अंतर्दृष्टी देणारं आहे. AI चा आपल्यापैकी फक्त काही लोकांवरच नाही, तर सगळ्यांवरच परिणाम होणार आहे. त्यामुळे हे पुस्तक समाजातल्या फक्त काही ठरावीक घटकांनीच नाही, तर सगळ्यांनीच वाचायला हवं.
डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मविभूषण,
FRS, नॅशनल रिसर्च प्रोफेसर, CSIR चे माजी डीजी,
इंडियन नॅशनल सायन्स अॅकाडमीचे माजी प्रेसिडेंट, नॅशनल इनोव्हेशन फौंडेशनचे माजी चेअरमन
….
कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात मानवाच्या उपजीविकेवर नकारात्मक किंवा सकारात्मक होऊ पहाणारा परिणाम व मानवाच्या जगण्याविषयीच्या संकल्पनांतच होऊ पहाणारी उत्क्रांती या अश्या गंभीर व अतिमहत्त्वाच्या बाबतीत सर्वंकश व सर्वसमावेशक चर्चा होणं अत्यावश्यक आहे. म्हणूनच अच्युत गोडबोले यांचं हे सखोल विवेचन असलेलं पुस्तक या संदर्भात वाचकांना पर्वणीच ठरावी.
डॉ. अनिल काकोडकर, पद्मविभूषण, प्रसिद्ध संशोधक, AICTE चे प्रतिष्ठीत चेअर प्रोफेसर,
‘राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी’चे चेअरमन
अॅटॉमिक एनर्जी कमिशनचे पूर्व चेअरमन
….
अच्युत गोडबोले यांनी लिहिलेलं ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हे पुस्तक म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे. AI च्या तंत्रज्ञानाची ओळख, त्याचा इतिहास, त्याचे उपयोग आणि भविष्य या सगळ्याची एखाद्या गोष्टीरूपात मांडणी केल्यामुळे हे पुस्तक खूपच वाचनीय व अभ्यासनीय झालेलं आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यावसायिक यांनी आणि खरं तर सगळ्यांनीच हे पुस्तक वाचायलाच हवं.
डॉ. विजय भटकर, पद्मभूषण, प्रसिद्ध संशोधक,
परम सूपरकॉम्प्युटरचे जनक, , C-DAC चे संस्थापक

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हा तांत्रिक विषय आहे. पण अच्युत गोडबोले यांनी तो अगदी सोप्या भाषात मांडला आहे. त्यामुळे ज्यांना या विषयात रस आहे. त्यांना तो समजायला सोपा जाईल. AI ची प्रगती, त्याचा आवाका, त्याचे उपयोग, आव्हानं, संधी .. या सगळ्यावर भाष्य करून लोकांना AI ची ओळख करून देणारं हे पुस्तक आहे.
डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, चेअरमन, AICTE
….
प्रवास
कोणतीही आधुनिक साधनं नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दींनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता १३ ते १७ व्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या प्रवासकथा, ते सोबत नेत असलेली होकायंत्रं, नकाशे अशी दिशादर्शक उपकरणं, जहाजांची निर्मिती, चाकांचा शोध, सायकल, रेल्वे, मोटरगाड्या, फुगे, एअरशिप्स, अवकाशयानं यांच्या निर्मितीकथा, उपयुक्तता, इतर गमतीजमती आणि अनेक रंजक कथांनी परिपूर्ण असलेलं तसंच भविष्यातल्या वाहनांचाही वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘प्रवास’ !

अच्युत गोडबोले व आसावरी निफाडकर यांचं हे पुस्तक म्हणजे मानवाच्या धाडसी प्रवासाचा व त्यासाठी वापरलेल्या साधनांच्या प्रवासाचा अप्रतिम इतिहास याहूनही अधिक रोचक असल्याचा प्रत्यय वाचकांना नक्कीच येईल.
डॉ. अनिल काकोडकर, पद्मविभूषण, प्रसिद्ध संशोधक,
AICTE चे प्रतिष्ठीत चेअर प्रोफेसर, ‘राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी’चे चेअरमन
अॅटॉमिक एनर्जी कमिशनचे पूर्व चेअरमन

अच्युत गोडबोले आणि आसावरी निफाडकर लिखित ‘प्रवास’ हे पुस्तक अप्रतिम झालेलं आहे. ...या पुस्तकामुळे मुलांमध्ये कुतुहल वाढेल अशी मला खात्री आहे. या पुस्तकातली माहितीही अमूल्य आहे. ज्यांना मराठी वाचता येतं, त्यांना तर हे पुस्तक नक्की आवडेलच, पण ज्यांना मराठी येत नाही, त्यांच्यासाठी हे पुस्तक इतर भारतीय भाषांमध्ये तसंच इंग्रजीमध्ये अनुवादित करावं असं मला वाटतं.
डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, चेअरमन, AICTE
….
अच्युत गोडबोले आणि आसावरी निफाडकर यांचं सुबोधित करणारं आणि अतिशय वाचनीय पुस्तक पुढच्या अनेक पिढ्यांसाठी मौल्यवान ठरेल. हे पुस्तक जास्ती जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते किमान इंग्लिश आणि हिंदी या भाषांमध्ये तरी अनुवादित व्हावं असं मला वाटतं.
डॉ. सदानंद गोखले
पूर्व प्राध्यापक आणि ‘एरोस्पेस इंजिनिअरिंग’ विभागाचे प्रमुख, आयआयटी, मद्रास   
…..
सजीव
सजीवांच्या उत्पत्तीपासून ते उत्क्रांतीपर्यंत आणि बायोटेक्नॉलॉजीपासून ते जेनेटिक्सपर्यंत जीवशास्त्राचा विकास कसा होत गेला याची मनोहारी कहाणी सांगणारं आणि जीवशास्त्राचा इतिहास, त्यातल्या संकल्पना आणि त्यातल्या वैज्ञानिकांची आयुष्यं यांच्या गोष्टींची रंजक गुंफण असणारं आणि जीवशास्त्राच्या प्रचंड मोठ्या कालपटलाचा वेध घेणारा नयनरम्य कॅलिडोस्कोप म्हणजे सजीव हे पुस्तक !!

जीवशास्त्राचं हे पुस्तक अत्यंत सुस्पष्ट, सुबोध आणि सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. सजीवांच्या बद्दलच्या सगळ्या संकल्पना आणि सखोल ज्ञान यात रंजक भाषेत दिलेलं आहे. जीवशास्त्राशी संबधित असलेल्या प्रत्येकानंच हे पुस्तक वाचण्यासारखं आणि संग्रहात ठेवण्यासारखं अमूल्य आहे. जीवशास्त्रातल्या ज्ञानानं झगमगून उठणारं हे पुस्तक प्रचंड यशस्वी होवो या अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांना शुभेच्छा !
डॉ. राजेश शर्मा. M.Sc., M.Phil, Ph.D, SET
असोसेट प्रोफेसर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट, बायोटेक्नॉलॉजी, VPASC कॉलेज, बारामती.
सजीवांच्या अफाट जगातील अगणित सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी यांच्या शरीर रचना, जीवनशैली, पेशी, ऊती, गुणसूत्रे, अनुवंशिकी, जैव रासायनिक प्रक्रिया त्यांचे पर्यावरणीय मूल्य आशा सगळ्याच बाबींचा घेतलेला आढावा खूप छान वाचनीय आहे. अशा रंजक विश्वाचे दर्शन घडविणाऱ्या ह्या पुस्तकाला आणि अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे या लेखकद्वयीला खूप खूप शुभेच्छा.
डॉ. ज्योत्सा निजसुरे, M.Sc. (Botany), PhD (Zoology),
प्रोफेसर, रामनिरंजन झुंझूनवाला कॉलेज, मुंबई.

हे पुस्तक म्हणजे शालेय विद्यार्थ्यांपासून उच्चशिक्षण घेणार्या सगळ्यांसाठी संदर्भग्रंथ तर असेलच पण कोणत्याही माणसाला जीवशास्त्राची चहुअंगी ओळख करुन करुन देणारं नितांत सुंदर मार्गदर्शक मित्रही असेल यात शंकाच नाही !
डॉ. बाळासाहेब गायकर,
चेअरमन, अॅकॅडॅमिक काऊन्सिल, पुणे विद्यापीठ, उपप्राचार्य अहमदनगर कॉलेज.

जीवशास्त्राच्या प्रचंड मोठ्या कालपटलाचा वेध घेणारा नयनरम्य कॅलिडोस्कोप म्हणजे अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी लिहिलेलं सजीव हे पुस्तक !!
प्रा. स्मिता वाडेकर, M.Sc., SET, GATE
माजी विभागप्रमुख, मायक्रोबायॉलॉजी, न्यू आर्ट्स कॉलेज, अहमदनगर.
Book Review
Write a review

Vaibhav Jadhav
18/09/2021

must read book
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat