Summary of the Book
एअरो मॉडेलिंग या अत्यंत वेगळ्या आणि महत्वाच्या क्षेत्राची ओळख पंकज कालूवाला यांनी या पुस्तकातून करून दिली आहे. विमानशास्त्राची प्रारंभापासूनची ओळख त्यांनी करून दिली आहे. विमानशास्त्राची प्रारंभापासूनची ओळख त्यांनी करून दिली आहे. प्रथम त्यांनी इतिहासाचे सिंहावलोकन करून विमानाच्या वायूगतिशास्त्राची ओळख करून दिली आहे.
विमानाचे स्थैर्य, हवेचा विरोध कमीत कमी कसा तयार करावा, पंखांचे जोडकाम, लँडिंग गियर्स, सोल्डरिंग व ग्लुईंग आदी माहिती ते देतात. पंखांच्या निरनिराळ्या भागांची माहितीही त्यांनी दिली आहे. शेपटीकडीलभाग, नाक, गियरबॉक्स, राईट प्लायर, न्युपोर्ट मोनोप्लेन, ब्लेरिओ मोडेल यांची ओळखही होते. भारताच्या हलक्या तेजस या लढाऊ विमानासंबंधी लेखाचाही पुस्तकात समावेश आहे.