Summary of the Book
या लेखांचे स्वरूप विविधांगी आहे. नाटक, चित्रपट, तत्त्वज्ञान, काव्य, विज्ञान आणि रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या घटना ही या लेखांचे निमित्त झालेली आहेत. रूढार्थाने हे समीक्षालेख नाहीत. तर विविध जाणिवांच्या निमित्ताने घेतलेला आपल्यातल्या अनुभवविश्वाचा, आपल्यातल्या अवकाशाचा शोध आहे. जीवनाच्या आणि साहित्यकलांच्या अमर्याद अवकाशाचे रसिकाच्या मनात पडलेले प्रतिबिंब मर्यादित पण त्याचे स्वत:चे असते. अशा आपुल्या अवकाशाचे प्रतिबिंब या आस्वादलेखांमध्ये सापडेल.