चिंतामण गद्रे
02 Jun 2020 09 34 PM
मी श्री गावडे ह्यांच्याशी सहमत आहे. मी ही कादंबरी 2 महिन्यांपूर्वी वाचली होती तेव्हा मलाही असेच वाटले होते की भास्करचा प्रयत्न हा अशक्य कोटीतील आहे. पण आज उत्तर प्रदेश,बिहारचे मजूर आपल्या मातृभूमीला परतण्यासाठी जे जीवाचे रान करतायत ते पाहून मला भास्करचा प्रयत्न पटला.
लेखकाने ह्या कादंबरी चा दुसरा भाग लिहावा अशी माझी त्यांना विनंती आहे. चॅटर्जी व जगन चे पुढे काय झाले हे जाणून घ्यायला मी खूप उत्सुक आहे.
सुभाष गावडे
06 May 2020 08 57 PM
मी ही कादंबरी प्रथम डिसेंबरमध्ये वाचली. त्यावेळेस ह्या कादंबरीच्या हिरो भास्करने विलायतेहून पायी चालत हिंदुस्थानात यायचा घेतलेला निर्णय मला अवास्तव वाटत होता. एवढे अशक्य कोटीतील धाडस कोणीही शहाणा माणूस करणार नाही असे माझे मत होते. परंतु आज लोकडोऊन मूळे इथे अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांची त्यांच्या गावी जाण्याची जीवघेणी शर्यत पाहून मला पटले की जेव्हा माणूस दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकतो, तेव्हा तो जीवावर उदार होत आपल्या ध्येय प्राप्तीच्या दिशेने वाटचाल सुरु करतो. त्यामुळे लेखकाने लिहिलेले मला मनापासून पटले व मी तसे लेखकाला फोन करून सांगितलेही.
खरोखर, एक वास्तववादी कादंबरी वाचल्याचा सुरेख अनुभव ही भास्करायण कादंबरी वाचून मिळाला.
पवार मुकेश
21 Feb 2020 10 36 AM
ह्या चित्तथरारक विषयावर आजपर्यंत मराठीत एकही कादंबरी प्रसिद्ध झाली आहे असे वाटत नाही. ह्या विषयाला हात घालून लेखकाने एक सिक्सरच मारलेली आहे. अशा प्रकारच्या लिखाणाला माझे शतशः प्रणाम. एक अप्रतिम कादंबरी वाचल्याचे समाधान मिळते.
धनंजय
03 Feb 2020 11 21 AM
एक अतिशय सुंदर कादंबरी वाचायला मिळाली. वाचत असताना भारावून जायला होते. मला सुद्धा एक गोष्ट वाटते की लेखकाने ह्याचा दुसरा भाग लिहावा , म्हणजे त्यात चॅटर्जी , जगन वगैरेंचे पुढे काय होते ते कळेल.
मराठीतील एक यादगार कादंबरी म्हणून हीची नोंद व्हायला हरकत नाही.
नायन
17 Jan 2020 08 56 AM
अप्रतिम पुस्तक आहे, वाचताना मी त्यात रंगून गेलो होतो, रावीराजच्या म्हणण्यानुसार त्यावर सुरेख सिनेमा होऊ शकतो
Raviraj
11 Jan 2020 12 06 PM
हे पुस्तक एकदा वाचायला घेतल कि संपवेपर्यंत खाली ठेवता येत नाही. फारच खिळवून ठेवणारी कथा आणि लेखकाची ओघवती भाषा शैली उत्तम आहे. माझ्या मते ह्या पुस्तकावर एखादा चांगला सिनेमा बनू शकेल. हे सुंदर पुस्तक उपलब्ध केल्या बद्द्ल बुकगंगा चे आभार . लेखकाला शुभेच्छा
Anand
11 Jan 2020 12 02 PM
नुकतंच हे सुंदर पुस्तक वाचण्याचा योग आला. युद्धकथा आणि प्रवासवर्णनांचा सुंदर मिलाफ लेखकाने ह्या पुस्तकातून घडवून आणलाय . सर्वच वयोगटातल्या व्यक्ती साठी आणि खास करून तरुणांना हे पुस्तक स्फूर्तिदायक ठरेल . मातृभूमी च्या ओढीने एखादा माणूस किती मोठे धाडस करू शकतो हे वाचून आवाक व्हायला होतं . लेखकाने लवकरच ह्या पुस्तकाचा उत्तरार्ध लिहून चट्टेर्जी चे पुढे काय झाला हे सांगावा . लेखकाचे हे पहिलेवहिले पुस्तक आहे ह्यावर विश्वास बसत नाही.
उत्तम पुस्तक आहे .. जरूर वाचा !!
किशोर
31 Dec 2019 06 01 PM
ही कादंबरी म्हणजे एक उत्कृष्ठ प्रवास वर्णन आहे. दुसरे महायुद्ध सुरू असताना दुर्दैवाने इंग्लंड देशात अडकलेल्या एका मराठी तरुणाने मातृभूमीच्या अतीव ओढीने खुशकीच्या मार्गाने परत यायचा घेतलेला निर्णय जेवढा थरारक होता तेवढाच त्याचा इंग्लंड ते भारत हा खुशकीच्या मार्गाने केलेला प्रवास सुद्धा चित्तथरारक असाच आहे. लेखकाने ह्या प्रवासात लागलेल्या विविध ठिकाणाची माहिती सुद्धा छान दिलेली आहे , त्यामुळे हे पुस्तक एकदा वाचायला घेतले की हातातून खाली ठेववत नाही.
साधी सोपी भाषा शैली असल्याने पुस्तक वाचताना आपणच भास्कर आहोत असेच वाटायला लागते, हे लेखकाचे यश म्हणायला हवे. ह्याचा पुढचा भाग लेखकाने लिहावा असे माझे मत आहे , म्हणजे काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील ( उदा. चॅटर्जीचे पुढे काय झाले ? इत्यादी)
हे पुस्तक तरुणांनी जरूर वाचावे असे माझे ठाम मत आहे.
लेखकाला धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Chinmay
24 Dec 2019 06 13 PM
फार दिवसाने एक अप्रतिम धाडस कथा वाचायला मिळाली.
जेव्हा एखाद्यावर दैववशात अचानक आपत्ती कोसळते,तेव्हा एखाद्या जिद्दीने माणूस अचाट साहस करू शकतो. वीर सावरकरांच्या प्रेरणेने विलायतेला बॅरिस्टर व्हायला गेलेल्या भास्करवर अशीं आपत्ती कोसळते. तो विलायतेत असताना दुसरे महायुद्ध सूरु होते व हा तिथे अडकून पडतो. जवळ पैसे नाहीत, खायचे काय, राहायचे कुठे अशी परिस्थिती ओढवते.मातृभूमीला परतायची अतीव ओढ स्वस्थ बसू देत नाही, त्यातून त्यानें पत्करलेला मार्ग अचाट होता. तो यशस्वी होतो की नाही हे मुळात कादंबरी वाचूनच कळते.
शेवटच्या पानापर्यंत ही कादंबरी आपल्याला खिळवून ठेवते.
लेखक नवोदित असला तरीही त्याने एखाद्या सिद्धहस्त लेखकाप्रमाणे लिखाण केलेय. लेखकाला शुभेच्छा