Summary of the Book
कथा हा कोणत्याही चित्रपटाचा गाभा असतो. मराठी साहित्याच्या दृष्टीने मराठी चित्र 'पटकथे' चा 'मराठी सत्य आणि चित्र 'पटकथा' हा अभ्यासग्रंथ डॉ. प्रवीण नारायण महाजन यांनी वाचकांसमोर सादर केला आहे. चित्रपटांची १९९३ ते २०१३ मधील शतकी वाटचाल यातून समजते. चित्रपट वाङ्मयाचा इतिहास सांगताना चित्रपटकथेची पार्शवभूमी, भारतीय चित्रपट कला व स्वरूप, चित्रपटांची भाषा, चलचित्राचा भारतीय प्रयोगाबद्दल माहिती देताना आद्यचित्रपटकथाकार जॉर्ज मेलीए, पहिला कथात्मक चित्रपट 'द ग्रेट ट्रेन रॉबरी; दादासाहेब फाळके यांचे योगदान यावर प्रकाश टाकलं आहे. चित्रपट तयार करताना निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय संकलन, संगीत , छायाचित्रण, वितरण, समीक्षण व प्रेक्षक या अंगांचीही ओळख यातून करून दिली आहे. मूळ विषय चित्रपटकथेच्या अंगभूत वैशिष्ट्ये सविस्तर आढावा घेतानाच 'आयोध्याचा राजा, 'नवरदेव', प्रतापगड', 'सामना' अशा नावाजलेल्या १५ मराठी चित्रपटकथांचे मूल्यांकन केले आहे. साहित्यकृती, कथा नाटक, ललित लेख, कविता या साहित्यप्रकारावर आधारित चित्रपटकथा तसेच च्चित्रपटकथेवरील दिग्दर्शकीय संस्कार झालेल्या चित्रपटांचेही मूल्यांकन यात केले आहे.