Summary of the Book
शालेय जीवनातील पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही पहिली सर्वांत मोठी स्पर्धा परीक्षा असते. बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असलेल्या या परीक्षेचा सराव करण्यासाठी 'पैकीच्या पैकी' हा आदर्श प्रश्नपत्रिका संच पूजा जाधव व जयश्री हांडे यांनी तयार केला आहे.
भाषेत मराठी व इंग्रजी तसेच गणित व परिसर अभ्यास भाग- १ (विज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र) आणि बुद्धिमत्ता चाचणी व परिसर अभ्यास भाग- २ (इतिहास) या तीनही विषयांची प्रत्येकी एक नमुना प्रश्नपत्रिका यात दिली आहे.
सरावासाठी नऊ प्रश्नपत्रिका दिल्या आहेत. प्रश्नांची उत्तरे व बुद्धिमत्ता चाचणी स्पष्टीकरणांसह उत्तरेही सांगितली आहेत. परीक्षेतील यशासाठी लक्षात
ठेवण्यासाठी गोष्टी यात आवर्जून नमूद केल्या आहेत.