Summary of the Book
विज्ञान, तंत्रज्ञानाचे शोध, संशोधन पाश्चिमात्य देशात झाले, असा समज सर्वत्र असतो. त्यामुळेच पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्याची वृत्ती आपल्या देशात आहे. पण प्राचीन भारतीय संस्कृती विज्ञान संपन्न होती. विसाव्या शतकातील अनेक विद्वानांनी हे अभ्यासाने सिद्ध केले आहे.
या आपल्या समृद्ध ठेव्याकडे लक्ष वेधले आहे सुरेश सोनी यांनी. 'भारताची उज्ज्वल विज्ञान-परंपरा' या पुस्तकातून विद्युतशास्त्र, यंत्रविज्ञान, धातूविज्ञान, विमानविद्या, नौकाशास्त्र,वस्त्रोद्योग, खगोलविज्ञान, स्थापत्यशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पती, कृषी, प्राणी, आरोग्य आदी विषयांत त्या काळी झालेले संशोधन आजही उपयुक्त आहे.
वैज्ञानिक अभ्यास व संशोधनकरणारे भृगु, अत्री, भारद्वाज, नारद, वसिष्ट, गर्ग, शौनक, कणाद, शुक्र, चाक्रायण, धुंडीनाथ, नंदीश, अगस्त्य आदी ऋषी होऊन गेले त्यांनी केलेले संशोधन, विज्ञानपरंपरेची ओळख यातून करून दिली आहे. याचा मराठी अनुवाद क. कृ. क्षीरसागर यांनी केला आहे.