n.v. joshi
16 Jul 2025 01 18 PM
सांगण्यात आलं ---- स्वाभाविकच त्याला घरची फार आठवण येत होती. तो भेदरून गेला होता. आईवडिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली पण परिस्थिती बदललेली असल्यामुळे या भेटी कृत्रिम, औपचारिक , अस्वस्थ करण्याऱ्या होत्या.
काही गमतीच्या प्रसंगांमुळे आत्मकथन अधिक वाचनीय झाले आहे .
पतंग उडवण्यात पटाईत छोटी मुलं एका हाताने चड्डी सावरीत दुसऱ्या हाताने पतंग काटीत असत .
दुसरे दोन प्रसंग वाचकांना गमतीदार वाटतील पण त्यांचा परिणाम काय झाला ----
"महाराजांच्या एका पार्टीच्या वेळी मी यजमानीण होते . पहिलाच अनुभव . बुजले होते . पार्टी संपल्यावर पाहुणे जायला निघाले तेंव्हा त्यांना निरोप द्यायला मी दारापर्यंत गेले नाही. मी त्यांना बाहेर अपेक्षित योग्य तऱ्हेने नेऊ शकेन याची खात्री नसल्यामुळे मी आतच थांबले ."
गायत्रीदेवींच्या बंधुराजानी, स्वतःला किंवा जयला मैत्रिणी असण्यात काही वावगे नाही असे जोरदार समर्थन केले . गायत्रीदेवी चिडून विचारतात "मग स्त्रियांना किंवा मला स्वतःला मित्र का असू नयेत ?" मोठेच धाडस! बंधुराजांना धक्काच बसला.
सातव्या एडवर्डच्या राज्यरोहणाला जाणं भागच होतं -- महाराजांना . पण त्यावेळी समुद्रापार जाणं निषिद्ध समजलं जात असे . तडजोड म्हणून जी प्रचंड तयारी केली होती (समुद्राला सोनंनाणं अर्पण करणे इ. ) त्याबद्दल वाचून करमणूक होते .
लक्ष्यात राहिलेली काही वाक्ये .
"आजी फारशी उंच नव्हती, पण तिच्या राजेशाही वागणुकीमुळे समोरच्यावर तीच उंच ठसायची"
"तिच्या रूपातून पाझरणारा गोडवा सगळ्यांचे डोळे खिळवून ठेवायचा."
(संदर्भ - कुचबिहार व जयपूर येथे महाराजांना प्रजेबद्दल प्रेम्, जिव्हाळा व प्रजेला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर व आपुलकी असे .)
हे परस्परसंबंध फार मनोज्ञ आहेत. रयतेच्या दृष्टीने स्नेह व प्रेम या गुणांनी जणु जयचं शरीर धारण केलं होतं.
आमचं आयुष्य आता विस्तृत राहिलं नव्हतं . अनेक पाकळ्या मिटल्या होत्या.
काही शैली, शिस्त, नियम नसलेल्या इमारती वाटेल तशा पसरल्या आहेत . आजूबाजूच्या सुंदर निसर्ग चित्रावर त्या विद्रूप डागाप्रमाणे दिसतात .
शोकाचा डोंब तिथे त्या क्षणी उसळला , त्याचा ध्वनी माझ्या कानापर्यंत आला . शारिरीक झटक्याप्रमाणे अति दुःखाने माझ्यावर तीव्र आघात केला.
पुस्तक खाली ठेवल्यावर , एका अतिशय कर्तृत्ववान , रूपवान, धाडसी (बारा वर्षांची असतांना वाघ मारणारी ) तडफदार अशा सुलक्षणेचे मनोहारी दर्शन घडले .
पुस्तक वाचल्यानंतर त्याविषयी श्रीमती प्रज्ञा जोशी (माझी आई) यांनी व्यक्त केलेले विचार.
(शुद्धलेखनाच्या चुका असल्यास त्यांना मात्र मी सर्वस्वी जबाबदार आहे )
n v joshi
16 Jul 2025 01 13 PM
'A Princess Remembers' हे शीर्षकच अगदी वेगळं वाटलं. आवडलंही. पुस्तकाबद्दल कुतूहल वाटलं. नंतर अनुवाद वाचनात आला. वाचायला सुरुवात करण्यापूर्वी काही काही प्रकरणांवर नजर टाकली. ड्यूक ऑफ एडिंबरोबरोबर केलेली शिकार, जॉन केनेडी यांनी केलेली प्रशंसा, प्रिन्स फिलिप यांचा शोकसंदेश, एलिझाबेथच्या राज्यारोहणसमारंभास उपस्थिती . . . हे सर्व उल्लेख वाचल्यावर काहीशी भयचकित झाले . फारच उच्च स्तरावरचं हे प्रकरण आहे असं दिसलं . नंतर विचार केला, जयपूरसारख्या एका मोठ्या संस्थानाच्या राणीचं हे आत्मचरित्र आहे, ते भव्य दिव्य असणारच!
एखाद्या पुस्तकाचं परीक्षण करतांना सामान्यतः दोन बाजू लक्ष्यात घेतात : कथावस्तू (matter) आणि शैली (manner, style). कथावस्तूबद्दल काय लिहावं . . .
बालपणापासून निवृत्तीच्या काळापर्यंत सगळं जीवन रोमहर्षक घटनांनी व्याप्त आहे . त्यातल्या त्यात उल्लेख करायचा म्हणजे त्यांचं कर्तृत्व. लोकसभेच्या निवडणुकीत त्या प्रचंड बहुमताने निवडून आल्या. प्रचार करतांना त्यांनी जनतेला मोठमोठी (खोटी) आश्वासने दिली नाहीत. जनतेचे हित हे एकच लक्ष्य ठेवून कार्य केले . त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे त्या कायदा बदलू शकत नव्हत्या. पण जनतेची गार्हाणी त्यांनी सरकारपर्यंत पोचवली व तक्रारींची दखल घेतली जाईल असे केले . शक्य असेल तिथे प्रत्यक्ष मदत केली. स्थानिक संस्थांना जागरूक करून त्यांच्याकडून जनतेची कामे करून घेतली. भावी काळात शाळा सुरू केल्या. प्रामणिकपणे चालणाऱ्या संस्था स्थापन केल्या.
निवृत्तीनंतरही त्यांची जनहिताची कामे व मदत हे व्रत सुरूच होते . युद्धकाळातील कामगिरी, चीनबरोबर भारताचा पराभव झाल्यानंतरच्या घटनांची माहिती या पुस्तकात आहे .
जनतेच्या प्रक्षुब्ध भावनांतून उमटलेले प्रस्ंग, गायत्रीदेवींचे स्वतःचे भाषण . . इत्यादि. राजकीय क्षेत्रात अभूतपूर्व यश , बडोद्याचे आजी-आजोबा, त्यांची वेधक कारकीर्द याचे वेधक चित्र , आणिबाणीतील निर्भय सहभाग , आईबरोबर केलेल्या रोमहर्षक सहली (युरोप आणि इतर देश ) ---
शैलीचा (style) विचार करता लक्ष्यात येते की गायत्रीदेवींची भाषा सहज सुलभ, ओघवती आहे . माझ्या समजुतीप्रमाणे ओघवती भाषा म्हणजे कथनाबरोबर वाचक वहात जातो . आपण लेखकाच्या बरोबरच आहोत अशी काहीशी जाणीव होते . लेखन वाचनीय होते आहे किंवा नाही याचा मुळीच विचार न करता उत्स्फूर्त सहजसुंदर आविष्कार , भाषेचा 'फुलोरा' कुठेच नाही.
दुसरा मुद्दा - वर्णनशैली. काही ठिकाणी लेखिकेची वर्णन करण्याची पद्धत चित्रासारखी मनोरम ( picturesque ) दिसते - राजवाड्याचे वर्णन , असंख्य नोकर , एडीसी असणारा भव्य राजवाडा , वापरातील वस्तू - पर्शियन कारपेट, हस्तिदंती पलंग, हिरे-मोती-पाचू जडवलेले शोभेचे प्राणी, उत्तम रंगसंगती साधून बनवलेले मौल्यवान खड्यांचे दागिने.
दुसरे चित्र आहे जयपूरचे शस्त्रागार - अखिल भारतात सर्वोत्तम. बंदुकांचे वेगवेगळे प्रकार (उंटावरून चालवता येतील अशा बंदुका) - दारू वाहून नेण्यासाठी बनवलेली शिंगे अतिसुंदर, त्यावर जलाचर प्राण्यांच्या शंखांची नाजूक सजावट -बंदुकांचे दस्ते व नळ्या सोन्याच्या - हस्तिदंत, मोती व स्फटिक जडवलेल्या तलवारी . ज्यात कलात्मकता नाही असे एकही शस्त्र
नव्हते . युद्धाची आयुधे इतकी सुंदर असू शकतात?
------------------------------------------
शिवपत्नी पार्वतीच्या सन्मानार्थ असलेला सण'तीज'. औपचारिक समारंभाच्या प्रमुखपदी असण्याचा गायत्रीदेवींचा पहिलाच प्रसंग. यथासांग पूजा (त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल अशी). सिटी पॅलेसच्या मंदिरात जाऊन प्रार्थना व नैवेद्य . पूजा आटोपल्यावर पार्वतीदेवींची शहरातील रस्त्यांवरून मिरवणूक . नंतर विस्तीर्ण मैदानात जत्रा ( तिथले खेळ पहाण्यासाठी
राजस्त्रियांना "भुयारी रस्त्यांच्या चक्रव्यूहातून" जावे लागे ) जत्रेत असतात तशी मिठाया, खेळणी इ. दुतर्फा दुकानं. त्यांची गडबड, स्त्रियांच्या रेशमी वस्त्रांची सळसळ, पैंजणांची रुणझुण, पुरुषांच्या रंगीबेरंगी पगड्या, सॅटीन व मखमलीने सुशोभित केलेल्या हौद्याचे हत्ती - त्यांची रांक, घोड्यांच्या अनेक चित्तवेधक कसरती - दृष्टीसमोर एकंदर दृष्य उभे राहील असे चित्ताकर्षक वर्णन
हत्ती महसूल वसूल करून आणतात तो प्रसंग , होळीच्या सणाचे वर्णन व सिटी पॅलेस संग्रहालयाची माहिती या सर्वांचं वर्णन करण्याची शैली वेगळी आहे . जमिनींचा सगळा महसूल अधिकारी हत्तीवरून गोळा करीत. मग तो महसूल महाराजांना देण्याचा समारंभ. सगळे हत्ती ओळीने येत. त्यांच्या सोंडेवर छान नक्षी असे . भरजरी कापडाची झूल, कपाळावर खड्या मोत्यांची जाळी, पायांत सोन्याचांदीची कडी --- असा थाट असे . वसूल हत्तीच्या पाठीवर मातीच्या भांड्यातून असे --- इत्यादि .
होळीचा 'धोकादायक' सण - महाराज जय व गायत्रीदेवींचे बंधू दोघे हत्तीवर बसून शहरातल्या रस्त्यांवर फिरत. जनतेला त्यांच्यावर रंग उडवण्याची मुभा असे . पातळ् मेणाचे छोटे चेंडू - त्यात रंग किंवा रंगांचे पाणी भरलेले असे . ते चेंडू त्या दोघांवर फेकले जात. तो वेदनामय अनुभव पण होळी ! जनाना भागात स्त्रियांचा होळीचा सण . मेणाचे चेंडू व चांदीच्या भांड्यातून जोराने रंग फेकून त्या माराने अंग दुखेपर्यंत . .
या वर्णनाला स्वरूपदर्शी ( graphic ) म्हणता येईल.
काही हॄदयस्पर्शी प्रसंग हळुवारपणे सांगितले आहेत .
संस्थाने भारतात विलीन झाल्यानंतर त्यांच्या सैन्यदलातील सैनिकांना रजा द्यावी लागणार होती. हा दुःखद कार्यक्रम नव्या सचिवालयासमोर झाला. पायदळातील सैनिकांनी दिलेली मानवंदना व परत केलेले 'कलर्स' जयने स्वीकारले . त्यानंतर कित्येक शतकांपासून इतिहासात शौर्यासाठी प्रसिद्ध घोडदळ गेले . त्यांनी आपापले ध्वज जयच्या स्वाधीन केले . प्रेक्षकांत बसलेल्या सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले .
जयला दत्तक देण्यात आलं तो प्रसंग . दहा वर्षांच्या या मुलाला 'दत्तक' म्हणजे काय याची सुतराम कल्पना नव्हती. एका मध्यरात्री त्याला उठवून प्रवासाला जायचं आहे अस