Summary of the Book
हाय,मी केशव आणि माझ्या आयुष्याचा पार लोच्या झालाय. माझ्या नोकरीला मी विटलोय आणि माझी प्रेयसी मला सोडून गेलीये .आह ,माझी सुंदर झारा .झारा काश्मीरची आहे .मुस्लीम आहे ती आणि मी सांगितलं का तुम्हांला ,माझ्या घरचे लोक जरा अं ,जुन्या वळणाचे आहेत असो .झारा आणि मी चार वर्षांपूर्वी एकमेकांपासून वेगळे झालो .ती तिच्या मार्गाने पुढे गेली. मला नाही जाता आलं .
तिला विसरण्यासाठी मी रोज रात्री दारू पीत राहिलो.तिला मेसेज केले ,फोन केले ,सोशल मिडीयावरही तिचा पिच्छा पुरवला.तिने माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं .
तिच्या वाढदिवसाच्या त्या रात्री मात्र झाराने मला मेसेज केला. पूर्वीसारखं ,तिने मला भेटायला बोलावलं हॉस्टेलमधल्या तिच्या १०५ नंबरच्या खोलीत .मी जायला नको होतं ,पण मी गेलो... आणि माझं आयुष्य कायमचं बदलून गेलं .
ही प्रेमाची गोष्ट नाही .ही गोष्ट आहे नप्रेमाची .