Summary of the Book
मीरा या तरुण कवयित्रीच्या निवडक कविताचे संपादन या ग्रंथात करण्यात आले आहे. डॉ. विनोद गायकवाड यांनी या ग्रंथाचे संपादन केले असून यामध्ये 81 कविता दिल्या आहेत. सात भागांत या कवितांची विभागणी करण्यात आली आहे. शब्दांतून शब्दब्रह्माचा शोध प्रीतीकडून, भक्तीकडील प्रेमप्रवास या पहिल्या दोन भागात वारा आणि कमळ तसेच रेशीमगाठ या कविता उल्लेखनीय आहेत. कवयित्रीला आलेल्या विविध अनुभवांतून या कविता साकारल्या आहेत.