Summary of the Book
वैद्य सुयोग दांडेकर (आयुर्वेदाचार्य), सहलेखक वैद्य अमोघ देशपांडे, वैद्या सौ. निलम शिंगटे यांच्या रससिध्द लेखणीचा व अनुभवसंपन्न व्यक्तिमत्वाचा प्रत्यय'गर्भश्रीमंती' या पुस्तकातून आपल्या अनुभवास येतो. ''आयुर्वेदानुसार जन्मतारखेनुसार स्वत:ला ओळखा व समृध्द व्हा'' या पुस्तकाद्वारे याबाबत लेखकांनी अभ्यासपूर्ण प्रयत्न करून जन्मतारखेनुसार महिनावार विवेचन केले आहे. Healthy mind in healthy body या म्हणीप्रमाणे आपण कसे शारीरिक व मानसिक रूपाने गर्भश्रीमंत होऊ शकतो, याचा ऊहापोह अत्यंत चांगल्याप्रकारे केला आहे याचा प्रत्यय आपणांस या संग्रहाच्या पानापानातून दिसून येईल. माणसाच्या आयुष्यात जो शारीरिक व मानसिक रूपाने गर्भश्रीमंत आहे तोच खरा गर्भश्रीमंत. या दृष्टीने पहाता हे पुस्तक उपयुक्तता, दर्जा, अचूकता, भाषाशैली या सर्व कसोटयांवर प्रशंसनीय आहे.
या पुस्तकाद्वारे जन्मतारखेवरून शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक अशा चौफेर पातळीवर गर्भश्रीमंती आपल्यापर्यत पोहोचवण्याचा सुरेख आलेख, उल्लेखनीय प्रयत्न वैद्य सुयोग दांडेकर, सहलेखक वैद्य अमोघ देशपांडे, वैद्या सौ. निलम शिंगटे यांनी केला आहे.
आपली शरीरप्रकृति, आरोग्य, त्याची जपणूक करण्यासाठी घ्यावयाची काळजी, व्यायाम आणि आवश्यक तेथे औषधी यासंबंधी केलेले विस्तृत विवेचन, अत्यंत सोप्या व सरल भाषाशैलीत वाचकांना देण्याचा लेखकांचा प्रयत्न स्तुत्य आहे.