Summary of the Book
आपली दिनचर्या सामान्यपणे कशी असावी? पूर्वी सुखसमृद्धीचा लाभ घेणारे आर्य कसे वागत असत? या संबंधीचे विचार आचारधर्म कटाक्षाने पालन करणारे ह.भ.प. डॉ. दत्तोपंतबुवा पटवर्धन यांनी स्वानुभवे 'आर्यांची दिनचर्या' या पुस्तकात संग्रहित केले आहेत. ते सुविचारी,सदाचारी माणसाला पटतील, आवडतील व अनुसरता येतील असेच आहेत. म्हणून बाल, वृद्ध, तरुण, स्त्री, पुरुष अशा सर्वांनाच हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. शारीरिक, कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्याच्या सुदृढतेसाठी सातत्याने धडपडणारे श्री. दिलीप कस्तुरे यांच्या अथक परिश्रमातून हे पुस्तक नव्या रुपात आपल्यापुढे आणत आहोत.