Summary of the Book
मानवी शरीरातील मेंदू हा अत्यंत महत्वाचा आणि नाजूक भाग. विज्ञान-तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी एकविसावे शतक सुरु होऊनही दीड शतक लोटली तरी मेंदूविषयी पुरेशी माहिती मिळालेली नाही. या अनाकलनीय मेंदूच्या संशोधनाची माहिती डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे यांनी 'गूढ उकलताना'मधून दिली आहे.
मेंदूतील ज्ञानकेंद्रे, विविध भावना, मेंदूचा विकास, गर्भधारणेनंतर त्याच्या वाढीची स्थिती, मज्जापेशीचे प्रकार, सपाट व गुळगुळीत मेंदू आणि सुरकुत्याअसलेला मेंदूतील फरक, मेंदू व त्याची प्रतिकार यंत्रणा, मेंदूचे आजार, आत्महत्येचे विचार कसे तयार होतात,
भावभावना व्यक्त होताना चेहऱ्याची हालचाल, गुणसूत्रात होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणारी 'हंटीग्टटन' व्याधी, विद्वत्ता आणि मेंदूचा संबंध, डावा व उजव्या मेंदूची कार्यक्षमता, मेंदूची लवचिकता, मेंदूतील लहरी, त्यांची कारणे, चिन्हांची भाषा आणि मेंदू, ऑक्सिटोसिनचे कार्य, मेंदूपेशी व यंत्रपेशी, झोपेचे नियंत्रण, मेंदू व चुंबकीय चिकित्सा आदी मेंदूशी संबंधित विषयांची माहिती यात दिली आहे.