Summary of the Book
मराठी माणूस मागे का पडतो ? संकुचित वृत्ती गाव न सोडणे, नवीन प्रयोग नाही, चमचेगिरी व शिपाईगिरी, जबाबदारी झटकणे अशी आणखीही काही करणे प्रकाश भोसले यांनी सांगितली आहेत. एवढेच नव्हे, तर उद्योजकतेविषयी सर्व मुद्द्यांचा समावेश त्यांनी त्याच्या या पुस्तकात केला आहे. ज्यू लोक जगात सर्वात यशस्वी आणि श्रीमंत का आहेत, या प्रश्नाचा मागोवा ते प्रारंभी घेतात.
करिअर काउन्सेलिंग, ई. - कॉमर्स, आर्थिक निरक्षरता, निर्णय क्षमता, टाईम मॅनजमेंट अशा विषयांवर त्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. टिप्स किंवा सल्ले हे या पुस्तकाचे वैशिष्टय आहे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी महत्वाचे गुण, गरिबीतून श्रीमंत बनवण्याच्या ४५ टिप्स, मुलांना यशस्वी उद्योजक कसे बनवलं - 30 टिप्स अशी याची उदाहरणे आहेत. मराठी माणसाचा विकास सहकार्यानेच होतो, असेही ते म्हणतात.