Summary of the Book
एखादा पुराणपुरुष अचानक आपल्यासमोर येऊन उभा राहिला, तर काय होईल? असेच काहीसे मनुचे झाले. त्यासाठी मूळ कथाच वाचायला हवी. पौराणिक कथेला वेगळ्या स्वरुपात समोर आणण्याचा प्रयत्न दर्शन देसले यांनी या पुस्तकातून केला आहे. मनु हा या कथेचा नायक. प्राचीन संस्कृतीचा अभ्यास हा त्याचा आवडीचा विषय. संस्कृतीचा शोध घेता- घेता, आयुष्याचा शोध घेण्याचा त्याचा ध्यास असतो.
या अभ्यासात महाभारतातील एक शापित व्यक्ति त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि एका गुप्त जागी येण्यास त्याला आमंत्रित करते. ते एक रहस्यमय शहर असते. पुढे अनेक चमत्कार घडत जातात. मनु अशा अनेक घटनांचा साक्षीदार होतो. कलियुगातील कल्की या अवताराबद्दल पुस्तकात सांगितले आहे.