Summary of the Book
देवदत्त पट्टनायक हे भारतीय पुराणकथांचे विवेचन करणारे सुप्रसिद्ध लेखक आहेत. या पथदर्शी पुस्तकात ते पौराणिक कथांतल्या विरोधाभासांवर भाष्य करतात. जन्म-मृत्यू, प्रकृती-संस्कृती, परिपूर्णत्व-शक्यता अशा अनेक पैलूंची ते अनोख्या दृष्टीकोनातून मांडणी करतात. कथनांच्या, रेखाटनांच्या एका विशिष्ट पद्धतीने ते हिंदू कथांचे पुन:कथन करतात; हिंदू प्रतीकांचे, विधींचे नवे अर्थ उलगडतात. क्रूरकर्मा कौरवांना स्वर्गप्राप्ती कशी होते, सतशील पांडवांना ( युधिष्ठीर वगळता ) नरकात का धाडले जाते; निरपराध सीतेचा त्याग करूनही राम 'आदर्श राजा' म्हणून का गौरवला जातो; रक्तप्राशन करणारी काली म्हणजे दुध देणाऱ्या गौरीचेच रूप कसे आहे हे आपण देवदत्त यांच्यासह शोधतो.
या पुस्तकाचा उद्देश पुराणकथांच्या पलीकडचा विचार करायला लावणे हा नसून, त्यांतील प्राचीन, चिरंतन आणि अद्यापही समर्पक असणाऱ्या भाषेच्या वाचनाचे समृद्ध आणि सक्षम होणे हा आहे.