Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
पुष्षाताईंनी संत जनाबाईंच्या ३४६ अभंगांचा सार्थ भावानुवाद सोप्या भाषेत केला आहे. अभंग आणि ओव्या जरी मराठी भाषेत असल्या तरी अल्पाक्षरी आणि त्यावेळच्या बोली भाषेत असल्याने समजण्यास कठिण जाते. लेखिकेने चिकाटीने अभ्यास करून, जाणकारांचे मार्गदर्शन घेऊन पुस्तक सिध्द केले आहे. यामागे त्यांचे वाचन, श्रवण आणि मननही आहेच. अभंगातील पौराणिक दाखले, उदाहरणे व तत्वविचार सर्वसाधारण वाचकाला उमजत नाहीत, तोच धागा पकडून लेखिकेने अभंगांचा भावार्थ उलगडून दाखवला आहे. काही अभंगातील आध्यात्मिक अर्थ उदा. अभंग क्र. १८७ (पान क्र. ११८) फारच सुंदर रीतीने त्यांनी विषद केला आहे. जनाबाईंचे अभंग क्र. १९८ ते २०१ म्हणजे मुक्ति आणि परब्रम्हप्राप्तिचा सोपानच आहे. ते वाचून संतमंडळींची जाणवते. काही अभंगातली रांगडी भाषा, विठ्ठलाला विचारलेला जाब व केलेली थट्टा वाचून गंमत वाटते. संत जनाबाईंच्या जीवनचरित्राची व अभंगांची यथार्थ ओळख पुस्तक वाचून होते. पुस्तक सुबक व देखण्या स्वरूपात छापले आहे. पुस्तकाचा टाईपही वाचकस्नेही आहे, लेखिकेचे व पुस्तक प्रकाशित करण्यास हातभार लावणार्या सर्वांचे अभिनंदन व धन्यवाद. श्रीराम घैसास. डोंबिवली.