Summary of the Book
आयुर्वेदाचे महत्त्व आज जगाने ओळखले आहे. मात्र, आयुर्वेदासंबंधी काही गैरसमजही आहेत. ते दूर करण्याचा प्रयत्न वैद्य. परीक्षित स. शेवडे यांनी या पुस्तकातून केला आहे.
पुस्तकाचे सहा भाग पाडले आहेत. पहिल्या भागात दिनचर्या व आयुर्वेद यांची सांगड घातली आहे. दुसऱ्या भागात उपचार आणि आयुर्वेद, तिसऱ्या भागात अपरिचित आयुर्वेद सांगितला आहे.
चौथ्या भागात जीवनावश्यक आयुर्वेदासंबंधात चर्चा केली आहे. आपण प्रकृती कशी ओळखायची आणि प्रकृतीनुसार कोणता आहार घ्यायचा याचेही मार्गदर्शन पुस्तकात केले आहे.
आयुर्वेदातील विविध संज्ञा पुस्तकात सोप्या करून सांगितल्या आहेत.