काळेकरडे स्ट्रोक्स
Pages: 219
Weight: 256 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789386493491

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 188 / $ 2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
उदास पोकळी... की पोकळीतच उदासी राहते भरून ?समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी ? का वागतोय असा ? 'इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस' सारखा कधी झपाटला जातोय... कधी 'पाय सोडून जळत बसलेल्या औदुंबरासारखा' गूकडे गुढाकडे ओढला जातोय.... कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन कवितांमधून व्यक्त होत जातोय.... आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, चैतन्याच्या मैत्रीमुळे कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते. या काळ्या पोकळीत त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात. मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास...अटळ !खाता- पिता- झोपता -उठता -भोगता ही उदासी समीरचा पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जागवतेही ! कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनव्हासवरचे.... समीरच्या अंतरंगातले... असे हे भन्नाट बोल्ड... काळेकरडे स्ट्रोक्स

‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5399761109769068687
Book Review
Write a review

Suhaj Shid
14/11/2022

ही कादंबरी इमाजीनेशन साठी छान आहे. पोस्ट मॉर्डन काळात जे घडत ते वास्तव्य मांडलं आहे. अतिशय अफलातून लेखन💙✍️🌍
Dhananjay More
13/01/2022

जबरदस्त आवडली. जणू काही एखादा चित्रपट पाहत आहोत अशीच सारी पात्र आणि चित्र डोळ्यांसमोरून सरकत कादंबरी पुढे सरकत जाते. थोड वाचून बघू म्हटलं पण कुठेच थांबता आल नाही आणि संपूर्ण दिवसात वाचूनच काढली. ऑफिसच कम तसच राहिलं. वर्क फ्रॉम होमचा असा फायदा करून घेतला.
Yogesh Jadhav
22/06/2019

Ekdam Kadak... Nice Story...
shrikant petkar
21/01/2019

"काळेकरडे स्ट्रोक्स " प्रणव सुखदेव या तरुण लेखकाची काल काळ्या येथील महानगर साहित्य संमेलनात भेट झाली . त्याने लिहिलेले काही पुस्तकं विकत घेतली .निळ्या दात दंतकथा कथासंग्रह वगैरे . आज वाचायला घेतलं ते "काळेकरडे स्ट्रोक्स " ही कादंबरी . समीरच्या कॉलेजच्या आयुष्यात येणाऱ्या मैत्रिणीबद्दल आपण वाचत जातो , वाचत जातो . सानिका , चैतन्य आणि समीरच्या मैत्रीत आपण मिसळत जातो. आजकालच्या तरुणाच्या मित्रात अरुणसारखा एखादा मित्रही असतो . एवढंही सत्य पटत राहते . आईवडिलांशी मुलाचं न पटनं , समीरचे घर सोडून जाणं .. प्रणव सखदेवच्या लिखाणात अशी काय जादू आहे कि आपण पान नं पुढचं पान वाचतच राहतो . आजच्या युगातील कॉलेजलाईफ यथार्थ रेखाटलं आहे. सुन्न होऊन जातो जेव्हा समीरच्या मित्राचा , म्हणजे अरुणचा अनुभव वाचला की , समाजात अशा घटना घडत असतात . घराबाहेर वाच्यता होत नसतात . कथाकार , लेखकाचं हेच तर महत्त्व , कर्तृत्व असतं ..समाजाला आरसा दाखवण्याचं ...
Sagar Achalkar
14/11/2018

कादंबरी आवडली. अगदी पहिल्या पानापासूनच कथेने पकड मजबूत केली जी शेवटच्या पानापर्यंत तशीच कायम राहते. म्हणजे पहिल्या पानावरच वाचक लेखकाचे बोट पकडतो आणि मग लेखक जिथे नेईल तिथे मुकाट्याने जात राहतो. मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. समीर, सलोनी, सानिका, अरुण, दादुकाका सगळ्याच पात्रांना depth आहे. अरुणच्या वहिनीचं पात्र थोडक्यात असलं तरी त्या पात्राने कादंबरीला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. त्या पात्राची एक वेगळीच कादंबरी किंवा दीर्घकथा होऊ शकते इतकी depth आहे त्यात. सलोनी आणि समीरच्या फ्रेंडशीपची प्रोसेस इंटरेस्टिंग आहे. कादंबरीत काही अनपेक्षित घटना आहेत ज्या मनाला चटका लावून जातात. ज्याबद्दल इथं बोलणं मी मुद्दाम टाळतोय. कारण इथे त्याचा खुलासा केला तर कादंबरीची मजा येणार नाही. महाविद्यालयीन आयुष्य+वैयक्तिक आयुष्य+प्रेम+सेक्स+ नाती+मैत्री+करिअर+सिगरेट्स+बिअर+कविता+फिल्म्स+पुस्तकं+अजून बरच काही=काळेकरडे स्ट्रोक्स तर कळेकरडे स्ट्रोक्स साठी प्रणव सखदेव यांचे मजबूत आभार!
Prof. Hari Narke
26/10/2018

प्रणव सखदेव हे नव्या पिढीतले महत्वाचे लेखक आहेत. त्यांची "काळे करडे स्ट्रोक्स" ही मजबूत कादंबरी आहे. सखदेव यांची लेखनकळा प्रवाही, चित्रशैलीतली आणि वाचकांशी गप्पा मारणारी आहे. मुंबईच्या रूईया महाविद्यालयात शिकणार्‍या तीन युवक युवतींची उत्तरआधुनिक काळातली चटका लावणारी गोष्ट या कादंबरीतून उलगडत जाते. अरण्या उर्फ अरूण आणि दादूकाका ही भन्नाट अवलियांची जोडी तर काळजातच घुसते. रूईया महाविद्यालयाचा परिसर, दडकर कट्टा, दादर, फाइव्ह गार्डन, मुंबई लोकलचा व्हीडीयो कोच आणि हिमाचल प्रदेश मधलं मॅकलीओडगंज ही नुसती स्थळं न राहता या कादंबरीतली अफलातून पात्रं बनुन आपल्याला भेटतात. सखदेवांनी समकालीन युवकांची घुसमट अतिशय प्रभावीपणे चितारलेली आहे. अवघ्या २१९ पृष्ठांमध्ये सखदेव फार मोठा ऎवज आपल्यापुढे चितारत जातात. कथेतली पात्रं गोलगोल न फिरता सतत विकसित होत जातात. त्यांची मानसिक आंदोलनं आपल्याला जखमी करत जातात. छळतात. तरूण पिढीचा टिपलेला जिवघेणा संघर्ष, औदासिन्य, व्यसनं, सेक्स, हलकल्लोळ,कोलाहल,पोकळी आणि आरपार भिडत जाणारा रक्ताळलेला प्रवास यामुळे ही कादंबरी महत्वाची ठरते.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat