Summary of the Book
विजय बेडेकर यांच्या ११ कथांचा हा संग्रह आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरच्या या कथांमध्ये वास्तव आणि कल्पनारम्यतेचा मिलाफ आहे. उदा. परफेक्ट या शीर्षक कथेतील मायकेल आणि आनंद या दोन्ही व्यक्तिरेखा त्यांच्या परिचयाच्याच आहेत. त्यामुळे सत्य घटनेवर आधारित ही कथा आहे. 'सरकारबाबू' ही कथाही टाटा मोटर्सचे कर्मचारी डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली सत्यकथा आहे.
आंतरराष्ट्रीय हेरगिरी, पोलिसी चातुर्य ते कौटुंबिक असे वेगवेगळे विषय असलेल्या या कथा वेगळी माहितीही देतात. 'नियती' या कथेचा शेवट वाचकांवरच सोडलेला आहे. या कथेच्या नायिकेसमोर दोन जणांनी विवाहाचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे ती संभ्रमात आहे. बहुतेक कथांचा शेवट कलाटणी देतो.