Summary of the Book
ज्येष्ठ कवी- गझलकार सदानंद डबीर यांच्या निवडक काव्यरचनांचं हे संकलन संपादित केलं आहे डॉ. राम पंडित यांनी. गझल, कविता आणि गीत अशा तीन विभागांत मिळून १३६ रचनांचा समावेश या संकलनात आहे. डबीर हे प्रामुख्याने गझलकार म्हणूनच परिचित असल्यानं या रचनांमध्ये गझलांची संख्या सर्वाधिक म्हणजे ९७ आहे. अन्य कविता २६, तर गीतं १३ आहेत.
संग्रहाच्या प्रारंभी पंडित यांनी डबीर यांच्या रचनांविषयी संकलक- संपादक या नात्यानं सविस्तर भाष्य केलेलं आहे, त्यात ते म्हणतात : ‘‘डबीर यांनी आपली सृजनप्रक्रिया एकसुरी होऊ दिलेली नाही. विधावैविध्य, विषयवैविध्य, विचारवैविध्य ही त्यांच्या पद्यरचनेची त्रिपुटी म्हणता येईल.’’