Summary of the Book
शाळा कॉलेज सुरू झाले, की एक प्रश्न डोके वार काढतो. अभ्यास कसा करायचा ? शिक्षक आणि पालक आपापल्या परीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. मात्र, शशिकांत कोनकर यांनी या छोटेखानी पुस्तकातून याच विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. परीक्षेत यश मिळवणे हे एक तंत्र आहे. कुठल्याही विद्यार्थ्याने हे तंत्र प्रथम अवगत करून घेतले पाहिजे, असे ते सांगतात. अभ्यास म्हणजे काय, अभ्यास करण्यासाठी कशाची आवश्यकता असते. यावर ते प्रारंभी चर्चा करतात.
अभ्यासाचे वेळापत्रक कसे तयार करायचे, वाचनाचे विषय, नोट्स कशा काढायच्या, परीक्षेचे तयारी कशी करायची याची माहिती देतात. एवढेच नव्हे, तर स्मरणशक्ती कशी वाढवायची, प्रकृती कशी सांभाळायची याबद्दलाही मार्गदर्शन करतात. बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या विविध पद्धतींची माहितीही त्यांनी दिली आहे.