फेसाटी
Currently unavailable

 
Hard Copy Price: 25% OFF
R 260 R 195 / $ 2.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
आजची मराठी कादंबरी अनेकस्तरीय जीवनानुभवामुळे समृद्ध आहे. समाजजीवनातील अनेकस्तरीय वाट, उपवाटांचे कथन तीमधून ध्वनित होत आहे. 'फेसाटी' या कादंबरीत पशुपालक, अल्पभूधारक शेतीसमूहातील तरुणाच्या संघर्षाची कथा साकारली आहे. नाथा गोरे या तरुणाच्या महाविद्यालयीन काळापर्यंतचा जीवनप्रवास या कादंबरीतून सांगितला आहे. हि जीवनकथा केवळ नकोशा शिक्षणव्यवस्थेपुरती सीमित नाही; तर त्यास अनेक कंगोरे आहेत. 'स्व' च्या शिक्षणप्रवासाबरोबरच कुटुंब आणि समाजातल्या अनेक महापेचांना ती साकार करते. दारिद्रयाचा शाप भली ल्यालेल्या आणि कर्जाच्या निरंतर सावटाखाली जखडलेल्या समाजाचे चित्र या जीवनकथेत समांतरपणे वाहते ठेवले आहे. गतविस्मृत ताईच्या गोठवलेल्या अपराधभावाच्या बोचणीतून या जीवनानुभावाला विवेकाचा स्वर प्राप्त झाला आहे. खेड्यातील व्यक्ती-समूहाची व्याधिकथा म्हणूनही तिला असाधारण महत्व आहे.
हा समाजपट सुंबरानच्या अख्यानरुपात गुंफला आहे. अतिशय ओघवत्या प्रवाही गद्याचे नितांत सुंदर परिमाण या गद्यकथेस आहे. गोष्टीवेल्हाळ आत्मपरता आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद व 'जत' परिसर बोलीची सहजता या कथनास आहे. 'जातु माझ्या मागाला, जातु माझ्या गावाला', 'सांगतु म्या जनाला', या दृष्टीने हि कथा सांगितली आहे. सगळीकडच वडं तुडुंब भरून वाहणारा भरघोस कथनऐवज तीमध्ये आहे. 'जवारी गई', 'शिंगरी', 'करंड', 'जुंधळं', 'येलतार' अशा अगणित शब्दरूपांनी या कथनाला सजीव बनविले आहे. अल्पाक्षरी शब्दबंधानी सजविलेले हे गद्य आहे. व्यक्ती, समाज, भू-जैविक वैशिष्टे आणि वर्तमान पेच साकारणारे नाथासुंबरानख्यान वैशिष्ट्यपूर्ण ठरेल.
Book Review
Write a review

तानाजी धरणे
30/07/2023

आदरर्णिय लेखक नवनाथ गोरे सरांची " फेसाटी " ही कादंबरी अस्सल साहित्याची खाण असुन ग्राणिम जीवनाचा खराखुरा लेखाजोखा मांडलेला आहे . लेकख नवनाथ गोरे यांनी ग्रामिण भागात शिक्षण घेत असताना येनार्‍या अडीअचणी स्वयंअनुभवातुन मांडल्या आहेत . कादंबरी वाचताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही .
Raviraj Jadhav
13/03/2021

पुस्तक प्रिंन्ट व्यवस्थित नाही मध्ये काही पाने प्रिंट झाली नाहीत.
Dr. Rahul Jagdale
10 Nov 2018 05 30 AM

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका कुटुंबाची ही संघर्षगाथा आहे. शिक्षणाची फारशी आवड नसलेला नवनाथ पुढे हळहळू उच्च शिक्षणाकडे कशी झेप मारतो यांचे एक विलक्षण व प्रभावी चित्रण या कादंबरीतून येते. लहरी निसर्ग व उदासीन सरकार यांच्या तडाख्यात सर्वसामान्य कुटुंबाची कशी ससेहोलपट होते याचे विदारक चित्र या कादंबरीतून येते. नवनाथचा शिक्षणासाठीचा कठोर व खडतर प्रवास विलक्षण असा आहे. संवाद व निवेदनासाठी बोलीभाषेचा वापर केल्याने भाषिक सौंदर्यात खूपच भर पडली आहे. एका उच्चशिक्षित तरुणाची ही कादंबरी खरोखरच युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी योग्य आहे असे वाटते .
sangramsinh chavan
10 Oct 2018 05 30 AM

गरिबीशी संघर्ष म्हणजे काय हे दर्शविणारे वास्तव म्हणजे फेसाटी
sangramsinh chavan
30/08/2018

...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat