Hard Copy Price:
26% OFF R 125R 93
/ $
1.19
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
संवेदनशील कवी प्रभाकर धोपटे यांचा स्वप्नपाकळ्या हा कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. जीवनयापन करीत असताना आलेले अनुभव प्रभाकर धोपटे यांनी तरलतेने, सहजपणे, संयमितपणे आपल्या कवितेच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्न केलेला आहे. जीवनाचे तत्त्व अतिशय साध्या-सोप्या आणि सरळ पद्धतीने सांगण्यात धोपटे केवळ यशस्वीच झाले नाहीत, तर तेवढ्याच उत्कट पद्धतीने रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यातही ते तितकेच यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या कवितांचा एक विशेष म्हणजे, त्यांची कविता गेयताप्रधान आहे. त्यांच्या अनेक कवितांमधून वाचक कविता सहज गुणगुणत आस्वाद घेऊ शकतो. सामाजिक जाण आणि भान असलेली धोपटे यांची कविता रसिकांच्या मनाचा ठाव घेते आणि ती रसिकांना आपलेसे करते. या कवितासंग्रहातील कवितांची रूपे विविधांगी आहेत. जगण्याच्या स्तरातील विविध अनुभव मांडण्यात धोपटे आपल्या कवितेशी प्रामाणिक राहिले आहे. आशयसामर्थ्य आणि रचनासामर्थ्य या दोन्ही बाजू त्यांच्या कवितेतून उत्कटपणे दिसून येत असून या कवितांना साहित्यमूल्य आहे. विचारांची अभिव्यक्ती जेव्हा होत असते, त्या वेळेस कवीचे तत्त्व आणि अनुभव सशक्त असावे लागतात. या दोन्ही पातळ्यांवर त्यांची कविता स्वतःला सिद्ध करते. धोपटे यांच्या कवितेला स्वतःचा चेहरा आहे आणि तो काव्यप्रांतात दिमाखदारपणे आपला ठसा उमटवणारा आहे, यात दुमत नाही.