Summary of the Book
माणसाचे आयुष्य कधी कोणते वळण घेइल हे कोणालाही सांगता येत नाही. आयुष्याच्या खाचखळग्यातून मार्गक्रमण करतानाचे अनुभव विजयराज खुळे यांनी 'अशी हि सापशिडी' मधून वाचकांसमोर ठेवले आहेत. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव हि लेखकाची जन्म व कर्मभूमी.
शालेय जीवनात वात्रट म्हणून ओळखले जाणारे विजयराज पदवीनंतर दुकानाकडे लक्ष घालतात. त्याचवेळी अन्यायाविरोधात मनात पेटलेल्या ठिणगीने त्यांना राजकारणातील प्रवेशाचे द्वार खुले होते. शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता, अंतुले यांना दिलेली साथ, जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत मिळवलेला विजय, सच्चा शिवसैनिक या राजकीय वाटचालीबद्दल त्यांनी यात सांगितले आहे. सत्तेची ही नशा त्यांना मद्द्यापर्यंत पोचविते. त्यांचे आयुष्य अंधकारमय होते. पत्नी वैशाली व तीन मुले यांची साथ आणि नाना धर्माधिकारी यांच्या पहिल्याच दर्शनाने दारूविषयी खुळे यांच्या मनात तिटकारा निर्माण होतो.
पुण्याच्या 'मुक्तांगण'मधून व्यसनमुक्तीचे उपचार घेउन पुन्हा सुखाशी नाते जोडले जाते. पण राजकीय जीवनातील अपयश, पत्नीचा मृत्यूने ते व्यथित होतात. त्यांच्या आत्मचरित्रातून हे सर्व वाचताना वाचकही जीवनतील वास्तवाला सामोरा जातो.