Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
मंगला गोडबोले यांचा अभिप्राय
निसर्गाची सर्वात वैविध्यपूर्ण निर्मिती कोणती? तर, ‘मनुष्यप्राणी’ असं म्हणतात ते काही खोटं नाही. बघावा तो नमुना स्वतंत्र, वेगळा, त्याच्यासारखा तोच! एकमेव! अद्वितीय!
म्हणूनच माणसांना न्याहाळणं, परस्पर तुलनेनं तोलणं आणि मौलिकतेसाठी पारखणं हा न संपणारा नाद अनेक संवेदनशील माणसांना लागतो. विजय तरवडे हे त्यापैकीच एक.
प्रचंड वाचनवेड, हौशी पत्रकारिता, हौशी आणि व्यावसायिक लेखन, एल. आय. सी.मधली कारकीर्द, गावोगावच्या बदल्या, जाऊ तेथे माणसं गोळा करण्याची हातोटी – ह्यामुळे त्यांना असंख्य माणसं भेटली. त्यापैकीच काहींच्या ह्या नोंदी. कोणी ए-वन, कोणी फेविकॉल, कोणी अघोरी, मोफतलाल, कोणी २१-२५ म्हणवलेलं, कोणाबरोबर बसायचं राहून गेलेलं... सगळी मजा आहे न् काय!
भरीला स. शि. भावे, सुहास शिरवळकर, प्रधानसर, सारडासर असे महारथीही रुचिपालटापुरते. माणसांच्या या जत्रेमध्ये तरवडे ह्यांचं बोट धरून जरूर फेरफटका मारावा अशी शिफारस मी करेन. वेळ चांगला जाईल ही खात्री! बाजूबाजूने जगण्याची समजदारी वाढू शकेल ही शक्यताही!
चांगल्या पुस्तकाकडून आपण आणखी काय मागणारे?
- मंगला गोडबोले
nirmiti Kolte
20 Apr 2017 12 42 PM
व्यक्तिचित्रणातली गंमत उलगडून ती पात्रे आपल्या डोळ्यासमोर शब्दात उभी करणं हे सोपं काम नाहीये..तरवडे काकांच्या फेबु पोस्ट (specially serials) वरच्या जश्या खुशखुशीत आणि to the point असायच्या तशीच ही 'माणसं'...स्टील च्या डब्यात गुटखा ठेवणारा सुशा ....हजरजबाबी कॅशियर काका..हे सगळे डोळ्यापुढे उभे राहतात.हरिदास नावाच्या मित्राच्या ठेंगणेपणाच्या गंमती सांगतानाची उदाहरणे वाचून हसू फुटल्याशिवाय राहात नाही...प्रधान सर ..भावे सर अश्या सृहुदांच्या आठवणी मनाला स्पर्शून जातात..दिपावल्ली च्या करामती..कुठल्याश्या अभिनेत्री बरोबर काकांचे सुत जुळवू पाहणारे श्यामराव ...खूप दिवसांनी..अशी खूप वेगळी पण आपली 'माणसं' साध्या सोप्या मिश्कील भाषेत भेटली..
काका मस्त झालंय पुस्तक...खूप अभिनंदन!!!