Summary of the Book
माणसाचा जन्म हा अनमोल मानला जातो. निरोगी शरीर हे आनंदी आयुष्याचा ठेवा आहे; पण जर काही व्याधी जडल्या, तर त्यावर काय उपाय करावेत, आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी कोणत्या वनस्पतींचा वापर करावा हे श. प. पटवर्धन यांनी 'शून्योपचार भाग - ८' मधून सांगितले आहे.
'आपल्या परीसरातील वनस्पती व आपले आरोग्य' ही या पुस्तकाची संकल्पना आहे. प्रत्येक वनस्पतीची वेगवेगळी माहिती, त्यातील कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटामिन्स, मिनरल्स, रस, गुण, वीर्य यात दिले आहे.
अडुळसा, अर्जुन, आले व सुंठ, आवळा, कांदा, अंजीर, काजु, आंबा, केळे, गाजर, गोखरू, चिंच, जांभूळ, जिरे, ज्येष्ठमध, टोमॅटो, डाळिंब, तुळस, द्राक्षे, दुर्वा, धणे, कोथिंबीर, नारळ, निरगुंडी, प्राजक्त, बडीशेप, पपई, मुळा, मेथी हळद आदी ५३ वनस्पतींची प्राथमिक माहिती, गुणधर्म, आरोग्यासाठी उपयोग दिले आहेत; तसेच कोणती काळजी घ्यावी, याची सूचनाही प्रत्येक वनस्पतीच्या माहितीच्या शेवटी दिली आहे. काढा, पाक, चूर्ण करायची कृतीही थोडक्यात सांगितली आहे.