Summary of the Book
सरकार जनतेसाठी कल्याणकारी योजना राबविते, समाजच्या विविध घटकांसाठी या योजना असतात. पण त्याची माहिती सर्वत्र पोचत नाही. प्रशासकीय यंत्रणा यात काही वेळा अपयशी ठरते. ग्रामीण भागाच्या विकासाशी निगडीत असलेल्या या योजनांचा सामान्यांना उपयोग व्हावा, तळागाळातील गरीब व्यक्तीलाही सरकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने गजेंद्र बडे यांनी 'योजनांची विकासगंगा' मधून ४५० योजनांची माहिती दिली आहे. कृषी, पणन विभाग, फलोत्पादन, पशुसंवर्धन, ग्रामोद्योग व मत्स्यसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, कामगार व समाजकल्याण अशा विविध क्षेत्रांतील योजना, त्याचे निकष, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कोठे कराल याबाबत मार्गदर्शन केले आहे.