आपले मूल हुशार असावे, अशी बहुतेक पालकांची इच्छा असते; पण त्यासाठी जाणीवपूर्वक प्रत्यत्न करणे आवश्यक आहे, असे डॉ. उमेश दोशी यांचे म्हणणे आहे. त्यांनी ‘हुशार मुले जन्मतील’ या पुस्तकातून मुलांवर करण्यात येणाऱ्या संस्कारांची माहिती दिली.
आपल्या मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून समजावून दिले आहे. यात शिक्षण इंग्रजीतून घ्यावे की मातृभाषेतून याची चर्चा केली असून, मातृभाषेतून शिक्षण मुलांच्या विकासासाठी कसे उपयुक्त ठरते हे सांगितले आहे.
त्याच प्रमाणे मूल गर्भात असल्यापासून त्याची जडणघडण कशी करावी हे स्पष्ट करावी हे स्पष्ट करताना गर्भसंस्कार, गर्भसंवाद, गर्भवतीने आपले आचारविचार कसे शुद्ध ठेवावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे. ‘डीएमआयटी’ चाचणीची उपयुक्तता समजावून दिली आहे. या चाचणीतून आपल्या पाल्याचा कल कशात आहे हे लक्षात घेता येते. हे लेखन करताना लेखकाने स्वानुभवच वाचकांपुढे मांडले आहेत. याचे शब्दांकन विजयालक्ष्मी सणस (आस) यांनी केले आहे.
‘हुशार मुले जन्मतील’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5564956830396367795