Summary of the Book
शापित राजहंस' ही अनंत तिबिले यांनी लिहिलेली संभाजीराजांच्या जीवनावरील दीर्घ कादंबरी मार्च 1978 ला ती प्रथम प्रसिध्द झाली. या कादंबरीची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. संभाजी राजांचे रोमांचक आयुष्य प्रतिभावंतांना नेहमीच खुणावत आलं आहे. शिवाजी सावंत यांची 'छावा’ आणि वसंत कानेटकर यांच 'इथे ओशाळला मृत्यू’ हे नाटक म्हणजे मराठी साहित्यातील लेणी आहेत. अनंत तिबिले यांनी देखील तीनशे त्र्याहत्तर पृष्ठांच्या दीर्घ आकारात संभाजी राजांचे व्यक्तीमत्व रेखाटले आहे. संभाजी राजांची दिलेरी, शूरपणा, सामर्थ्य, देखणेपण, धर्माभिमान या गुणांनी मराठी मनालाच नव्हे सर्वांनाच मोहिनी घातली आहे. प्रस्तुत कादंबरी पूर्वी पैंजण, बुवा, कादंबरी या मासिकांमधून प्रसिध्द झाली व नंतर तिचे पुस्तकरुपाने प्रकाशन झाले आहे.