Summary of the Book
`होमकुंड’ ही गोमंतकात सत्तर-ऐंशी वर्षं होत असलेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाचा वेध घेणारी कादंबरी.
1910 साली पोर्तुगालमधील राजेशाही संपुष्टात आली. त्या राष्ट्रानं लोकसत्ताक पद्धती स्वीकारली. परिणामी गोव्यातलं कोंदटलेलं वातावरण मोकळं ढाकळं झालं. धार्मिक निर्बंध सैल झाले. मात्र सालाझारप्रणित दडपशाही चालूच राहिली. डॉ. राममनोहर लोहिया 1946 मध्ये गोमंतकात आले आणि पुढील पंधरा वर्षं मुक्तिसंग्रामाचं होमकुंड धगधगत राहिलं. गोवा मुक्त झाला. एक पर्व संपलं. त्यानंतरची वाटचाल अधिकच खडतर. अधिक काटेरी बनली...