Summary of the Book
इतिहास हा एखाद्या प्रदेशाचा भूतकाळ असतो. तो सांगताना, लिहिताना घटना, क्रमवारी दिली जाते. तसेच इतिहास घडविणाऱ्या
व्यक्तीमत्वाचा परिचय करून दिला जातो. नरेंद्र चपळगावकर यांनी अशा ऐतिहासिक माणसांचे चित्रण 'संस्थांनी माणसं' मधून केले आहे. हैद्राबाद संस्थानात निजामशाही नांदत होती.
त्या काळातील राज्यकर्ते. जहागीरदार न्यायाधीश, अधिकारी, नवाब, तहसीलदार, सल्लागार व सामान्य माणसाचे चित्रण यात केले आहे. आला हजरत उस्मानअली, महाराणा किशनप्रसाद, शामराज बहादूर, रायरायान, न्या. केशवराव कोरटकर, नवाब मेहदी नवज जंग, नवाब अली यावर जंग, सपर वोंल्टर मॉक्टन, आदींची चरित्रातून त्यांचा संघर्ष, नाट्य, इतिहासाला वळण देण्याचा प्रयत्न यांची चर्चा केली आहे.