Vaibhav
05 Oct 2019 05 30 AM
Nice
कैलाश कृष्णा सावंत - ठाणे
27/05/2014
कविता मनाला साद घालणं-या आहेत... काही कविता गाता येतातात हे एक वैशिठ्य आहे.
प्रवीण गायकवाड - वर्धा
27/05/2014
कविता संग्रह आवडला, कविता मध्ये विविधता आहे. खूपच छान...
रमेश ठोंबरे
07 Apr 2013 05 30 AM
इंटरनेट, ऑर्कुट, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात मराठी कवितेचा एक मोठा लेखकवर्ग व वाचकवर्ग घडविणा-या "कविता सागर प्रकाशन" समूहाचे हार्दिक अभिनंदन आणि कवी बाळ बाबर यांना पुढील लिखाणासाठी बेस्ट ऑफ लक....
सौमित्र आणि वैभव - नागपूर
07 Apr 2013 05 30 AM
हा कविता संग्रह एक आगळा वेगळा असून जगभरात पसरलेल्या कविताप्रेमींच्या पसंतीला उतरेल अशी आम्हाला खात्री वाटते.
कवी विष्णू खरे - स्वीडन
07 Apr 2013 05 30 AM
जेव्हा कवीच्या लक्षात येतं की आपली कविता जगभरात निरनिराळ्या भाषांतून वाचली जाते तेव्हा या गोष्टीचा त्याच्या कवितेवर नक्कीच प्रभाव पडतो. त्यातीलच एक “बाळ बाबर” एक कवी... खूप उंच, खूप खोल!
भानू काळे - संपादक अंतर्नाद मासिक
07 Apr 2013 05 30 AM
बाळ बाबर हे कवितेतील सानेगुरूजीच आहेत असे मला वाटते.
कवी दत्ता हलसगीकर - सोलापूर
07 Apr 2013 05 30 AM
कवी बाळ बाबर यांच्या कविता मनोमन भावल्या. कवी बाबर यांच्या कविता त्रागा करणा-या नाहीत. जसे आणि जे आहे त्यातच आनंद मानावे असा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांच्या कविताही तशाच पण मनाला हलवून टाकणा-या आहेत. जयसिंगपूर हे विविध देवांचे मंदिर आहे तसे सारस्वतांचे मंदिर आहे. या जयसिंगपूरच्या मातीने अनेक सुपुत्र जन्माला घातले. त्यातलेच कवी बाळ बाबर आहेत. त्यांच्या कवितेत सर्जनशील आणि संवेदनशीलता आहे. अत्यंत शांत आणि मृदू स्वभावाचे कवी बाळ बाबर हे अंर्तमनातील आवाज जपणारा कवी अशीच ओळख आता निर्माण झाली आहे.
कमी शब्दात जास्त अर्थ व्यक्त करणारी आपली कविता आवडली.
कवी मनोहर मंडवाले
30/06/2013
कविता सर्वांनाच आवडली. आणि मग मी त्या कवितेचं पोस्टर बनवून ती सर्वदूर पोहचवावी असा विचार केला....
Asmita Pawar - Solapur
30/06/2013
खूपच छान कविता, खूप आवडली..
काविता माला फार आवडली. तुमचे खरेच अभीनदन. Keep it up sir ...
दैनंदिन जीवनातील टिपलेले साधे परंतु मार्मिक प्रसंग आणि कविता ... शोध आजवरी घेत होतो. सांपडले परि तेच समाधान. उत्स्फूर्तपणे जे करीत आलो. त्यातच दिसली बीजे महान.... कविता आवडली वाचून समाधान वाटले.
मच्छिंद्र ऐनापुरे, जत
30/06/2013
सुंदर कविता आहे, कविता आवडली. छानच!
कविता इतक्या आवडत गेल्या की कविता आवडली की मी पुन्हा मुखपृष्ठ बघायचो मोठ्या आपुलकीने, मनात कवीविषयीची आस्था बाळगत पुन्हा मलपृष्ठावरील त्यांचे रेखाचित्र पहात असायचो. कदाचित एखादं पुस्तक भावणं, मनाला भिडणं काय.... ? अप्रतिम कविता आहे.
कवी आनंद जोर्वेकर
30/06/2013
तुमच्या कविता चार - पाच वेळा तरी वाचल्या. एकदम कित्येक दिवसांनी एखादे सुंदर गाणे ऐकावे तसा आनंद प्रत्येक वेळी झाला. म्हणजे तुमची कविता मला आवडली. याचा अर्थ प्रत्येक कविता आवडली...
कविता आवडली.... कदाचित मलाही असेच लिहायला आवडेल. आवडते...
Sachin P. Kulkarni
30/06/2013
... मला कविता आवडली पण कवितेचा शेवट अजुन काहीतरी वेगळा हवा होता
कविता आवडली. आव्हान देणारी खंबीर आणि आत्मविश्वासी अशी वाटली. कठीण विषयावर सहज, सुंदर, आशयगर्भ काव्य करणं अवघड असतं, पण तुम्ही ती किमया उत्कृष्ट साधलीत. कविता आवडली....
कविता आवडली. मात्र काहीशी पारंपारिक संकल्पनांनी भरलेली आहे.
p.ram nandiwale
28/06/2013
sir i red u r gav pandharichi nani book it is very good.
विक्षिप्त अदिती
21/06/2013
कविता फार समजत नाहीत तरीही या कविता समजल्या आणि आवडल्या.
दोन्हि कविता आवडल्या, सविस्तर प्रतिसाद नंतर देतोच.... कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे?
कविता आवडल्या विशेषत: पहिली
आपल्या स्रुजनाच्या ताकादीची जाणीव असणारे काही लोक सोडले तर बाकी आपण सगळेच, 'कशाला काही लिहायचे... कोण वाचणार..’ , 'थोरा मोठ्यानी लिहुन ठेवलेय तेच वाचावे आणि गुमान बसावे’ अश्या प्रश्न्नानी, विचारांनी ग्रासलेले असतो. रोजच्या जगण्यातल्या कुठल्यातरी अत्रुप्त स्वप्नाच्या छायेमधे हीनगंड बाळगु लागतो. कित्तेक वेळा सुप्त मनात असलेली ही गोष्ट तुमच्या मनातली कविता कागदावर उतारु देत नाही... पण मला वाटते वरची गोष्ट नक्कीच या उगीचच्या जडत्वावरचे झाकोळ दूर करेल आणि 'एक चांगला माणूस’ होण्यासाठी मनाची कवाडे स्रुजनाच्या दिशेने उघडी करेल...
Dilip Sonawane
20/06/2013
मी आयुष्यात जे पाहीलं-दिसलं, दिलं-घेतलं, सोडलं-सांडलं, भावलं-जपलं त्यासगळ्यावर कविता लिहीण पसंत करतो. त्यामुळे काही कवितांत अतिशय वैयक्तीक संदर्भ येणे हे अपरीहार्यच आहे.कविता ही माझ्यासाठी आयुष्यातल्या व्यक्त-अव्यक्ताच्या मधली कुठलीतरी जागा आहे.त्यामुळे एका जाणीवांच्या गुलामासारख मी कविता लिहुन ही जागा भरत-जपत असतो.
विश्वास गायकवाड - न्यू इंडिया सेंटर - USA
20/06/2013
प्रत्येकजण आपले जीवन जगताना, काहीतरी वेगळ करण्यासाठी धडपडत असतो..असे असताना खूप कमी व्यक्ती आपल्या आवडत्या छंदाला वाव देतात आणि आपल्या गुणांना लाकांसमोर घेऊन येतात. आपल्या मायबोलीमध्ये, मातृभाषेत कोणीतरी कार्य करतो आणि त्याचे कौतुक होते. ज्ञानेश्वरांनी या मराठी भाषेला आमृतातेही पैजा जिंके असे म्हटले आहे. अमृतापेक्षाही गोड अशी अवीट जिची गोडी आहे त्यात जेष्ठ साहित्यिक बाळ बाबर यांनी कार्य केलंय.. आपल्या भाषेचा थोडासा उपकार, परतफेड जेष्ठ साहित्यिक बाळ बाबर यांनी केली आहे. आम्ही अनेक मराठी माणसे नोकरी / शिक्षण याच्या निमित्ताने साता समुद्रापार राहतो, भारत माते पासून दूर आहोत, पण सुनील सारखे तरुण प्रकाशक शब्दांचे शिल्पकार बनून भारत मातेची व सरस्वतीची सेवा करत आहेत हि बाब आमच्यासाठी गर्वाची आहे, अमेरिकेमधील इतरही मान्यवरांनी सुनील बद्दल खूप चांगले उद्गार काढले आहेत, आणि कवी बाळ बाबर यांचं काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या आणि पुस्तक प्रकाशन सोहळा यशश्वी रित्या पार पडो, सुनील आम्हाला कविता संगराहाची छापील प्रत पाठवेल याचा आम्हाला विश्वास आहे. अमेरेकेतील मराठी वाड.मय मंडळातर्फे सुनीलला आणि कवी बाबर यांना हि शुभेच्छा...
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.
Padmakar (पद्माकर) - Kolhapur
20/06/2013
कविता म्हणजे काय? हा प्रश्न पडल्यावर थोरांची कवितेची व्याख्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 'सृजनशील आत्म्याचा उच्चार', 'भावनांचा उत्कट आणि उत्स्फूर्त आविष्कार', 'नि:शब्दाला शब्दात आणण्याचे साधन', 'भावनेत भिजलेला शब्द' अशा अनेक व्याख्या वाचल्या आणि कविता म्हणजे काय? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामागचा फोलपणा जाणवला.
कविता म्हणजे वर उधृत केलेलं सगळं काही आहेच, पण त्यापलिकडेही काहीतरी आहे जे एक संवेदनाक्षम मन सहज जाणू शकतं. आणि त्या मनाला व्याख्या समजावून घेण्याची आवश्यकता नाही!
आपल्या गाव पंढरीच्या गाणी मध्ये विविध विषयावरील कवितांचा समावेश पाहून आनंद झाला... धन्यवाद.
हा खूपच चांगला संग्रह आहे...
सुधा मधुसूदन जोशी
20/06/2013
कविता लिहिणं अवघड... आधी कविता सुचणं अवघड त्यात लिहिणं त्याहून अवघड. कविता संग्रहाच्या अनुक्रमणिकेवरून असे दिसून येते कि बहुतेक विषय कवीने या कविता संग्रहात हाताळले आहेत. स्वर्गीय डॉ. सरोजिनी बाबर यांची प्रस्तावना या काव्यसंग्रहाला आहे. कवी बाळ बाबर यांचा हा दुसरा कवितासंग्रह / दुसरी आवृत्ती आहे. या कवितांना स्वतःची अशी लय आहे. जयसिंगपूर येथील कविता सागर प्रकाशनतर्फे हा बालकविता संग्रह इंटरनेटवर प्रकाशित झाला आहे. (बहुतेक त्याची छापील आवृत्ती सुद्धा तयार झाली आहे, शक्य झाल्यास प्रकाशक डॉ. सुनील पाटील ०२३२२ - २२५५००, ९९७५८७३५६९ यांना संपर्क साधून छापील प्रत मिळवता येईल का याची चौकशी करा)
सौ. विनिता लक्ष्मन पाटिल - डोंबिवली
20/06/2013
सांसारीक व्यापातून मनाला विरंगुळा मिळावा, शांतता लाभावी, असा एखादा छंद ज्यातुन आत्मिक आनंद मिळेल असा एखादा योग सर्वांच्याच वाट्याला येतो असे नाही. नाव आणि पैसा कमावुनही माणुस तितकासा समाधानी नसतो.धनीकांना धन मिळविन्याचा हव्यास असतो तर प्रतिष्ठितांना आनखी प्रतिष्ठा. तशीच ओढ एखाद्या वारकर्याला वरंवार पंढरीला जाण्याची असते. एखद्या कुंभाराच्या हातुन मातीचे लहान-मोठे नवनवीन आकार साकारावेत, चित्रकाराच्या कुंचल्यातून विविध चित्र जन्मावेत अगदि तसच साहित्यीकांचही असत. गाव पांढरीची गाणी हा नुसता आत्मिक नव्हे तर आध्यात्मिक आनंद देणारा, निसर्गामध्ये घेवून जाणारा, सुख दुख सांगणारा कविता संग्रह आहे. प्रत्येक कविता हा कवी बाळ बाबर यांचा स्वानुभव आहे असे दिसून येते, त्यातच ती जन्मलेली आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते, तरुण प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. कवी बाळ बाबर आणि प्रकाशक डॉ. सुनील पाटील या उभयतांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक सुभेच्या ....
सतीश टोणगे - कळंब
20/06/2013
खरा कलाकार ग्रामीण भागातच दडलेला आहे. पण त्याला व्यासपीठ मिळत नसल्याने हे कलाकार, साहित्यीक गाव कुसाबाहेर पडू शकले नाहीत. कविता कवीला बसू देत नसते व एका कवीचे मन कवीच ओळखू शकतो. या कविता संग्रहामध्ये दर्जेदार कवितेचा समावेश आहे. मुखपृष्ठ ही रेखीव असुन त्यातुनही वेगळा संदेश मिळणार आहे. हा दर्जेदार कविता संग्रह सर्वांनाच आवडणारा आहे.
कुलकर्णी सु. दा. - नाशिक
20/06/2013
कवी बाळ बाबर यांची कविता ही केवळ ‘मी’ ची किंवा समाजाची किंवा वेदनेची किंवा निसर्गाची कविता नाही. ती या साऱ्यांमधील मूलभूत संबंधाचा वेध घेण्याचा प्रयत्न ही कविता करते? म्हणूनच ती निर्वासितांच्या छावनीत ेएकटीच बसलेली दिसते.एका कवीचं सुजाणपण येण्याच्या ऐन वयात बाळ बाबरचा पहिला कवितासंग्रह आला, या संग्रहाने उभ्या मराठीचे आणि महाराष्ट्रातील तमाम नामवंतांचे लक्ष्य आपल्याकडे वेधले आणि कवी म्हणून बाळ बाबरनी आपली नाममुद्रा पक्की केली. फार तर असे म्हणता येईल की, हा झाला इतिहास. आता तो मागे म्हणजे, फार मागे पडला. निदान पस्तीस एक वर्षे तरी. आणि आता कविता सागर प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या वतीने सुधारित नवी आवृत्ती प्रसिद्ध झाली व ती इंटरनेट च्या माध्यमातून जगभरात पोहचली त्याबद्दल बाळासाहेब तुमचे खुल्या दिलाने स्वागत आणि मन:पूर्वक अभिनंदन! तुम्ही स्वीकारले तरी.. आणि नाकारले तरीही.