Summary of the Book
ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान सर्वांना माहीत आहे. ज्ञानेश्वरीवरील त्यांचा अभ्यास, ती समजावून सांगण्याची हातोटी याचा अनुभव अनेकांनी घेतलेला. अध्यापन, संशोधन, समीक्षा, ललित लेखन, ज्ञानेश्वरीचा अभ्यास हे त्यांचे पैलू व मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांशी असलेले नाते याचे माहिती पुढील पिढीला व्हावी, या हेतूने सप्तपर्णी : स्त्रीसंवेदन या अभिनंदन ग्रंथाची निर्मिती स्मिता लाळे यांनी केली आहे.
यात त्यांच्या शिष्या असलेल्या व आता अध्यापन, लेखन या क्षेत्रांत स्थिरावलेल्या श्यामला मुजुमदार, मृणालिनी पाटील, संगीता जोशी, स्मिता शानभाग, रेवती बासू आदींनी दभिंच्या वाड्मयीन कर्तुत्वाविषयी लेखातून आदर व्यक्त केला आहे. तसेच मेघना पेठे, सत्वशीला सामंत, माधवी देसाई यांनी पत्रसंवादातून त्यांचे व्यक्तिमत्व उभे केले आहे.