Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
संतोष अरविंदेकर यांनी लिहिलेली ही आत्मकथा राज्य परिवहन सेवेतील अनेक अनुभव सांगणारी आहे. "एसटी' विभागात 12 वर्षांपेक्षा जास्त काळ घालवलेले संतोष अरविंदेकर सध्या पस्तिशीत आहेत. खरे तर हे वय आत्मकथा लिहिण्याचे नाही. कंडक्टर म्हणून काम करणार्या संतोष यांच्याकडून भावनेच्या भरात एक चूक घडली ती त्याना दु:खाच्या खाईत ढकलणारी ठरली. खरे तर आजच्या भ्रष्टाचाराच्या कोटी कोटी आकड्याच्या प्रकरणांमध्ये संतोष यांनी केलेली चूक तशी किरकोळ मानावी लागेल. पण त्याच्याकडून चूक घडली हे सत्य. अर्थात ते त्यांनी नाकारलेले नाही उलट त्यांनी चूक कबूल करून आपल्याला पुन्हा एकदा कामाची संधी द्यावी, अशी विनंतीच या आत्मकथनात आहे. चूक कबूल करायला खूप मोठे धैर्य लागते ते धैर्य संतोष यांच्याकडे आहे. पहिलेच पुस्तक असूनही संतोष यांच्या लेखनात कच्चेपणा जाणवत नाही. ओघवती भाषा आणि निवेदनातील सच्चेपणा वाचकाला नक्की भावेल.
मा.श्री. अरविन्देकर "मास्तर "
आपले पुस्तक वाचायला घेतले आहे. सर्वप्रथम एका नव्या व अपरिचीत जगाची ओळख आम्हा वाचकांना करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! आजवर प्रकाशित झालेल्या मराठी पुस्तकांमध्ये या विषयावर लिहिले गेलेले बहुधा हे पहिलेच पुस्तक असावे.
आता थोडे पुस्तकाविषयी. हे पुस्तक वाचतांना पदोपदी जाणवतो तो म्हणजे आपला प्रांजळपणा. आपली लेखनशैली प्रवाही आहे.काही अपवाद सोडता आपले लिखाण कुठेही कंटाळवाणे,लांबलेले वाटत नाही. कथनाच्या ओघात येणारे / होणारे प्रासंगिक विनोद, ग्रामीण भागातील माणसांचे इरसाल नमुने, एस्टी महामंडळ परिवारातील लोकांची शिवराळ भाषा, त्यांचे स्वभावविशेष या सर्व गोष्टी थेट द.मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या लेखनाची आठवण करून देतात.या सर्व गोष्टी दैनंदिन व्यवहारात प्रत्यक्ष अनुभवत असूनही आपली तटस्थ, संयमित वृत्ती कधीही ढळली किंवा चळली नाही तसेच वाटेत येणाऱ्या क्षणिक प्रलोभनांना आपल्या परिवारातील लोक जिथे शिंगावर घेऊन उपभोगतात त्याच परिवारात राहून आपण अशा प्रलोभनांना शिंगावर घेऊन बाजूला फेकलंत याबद्दल आपले कौतुक तर आहेच पण याचं आपल्या संयमित वृत्तीमुळे आपण एका मनस्वी, निस्वार्थी प्रेमाला मुकलात हे आपले दुर्दैव.
मा. श्री. सुभाष भेंडे सरांनी प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे आपण एम ए मराठी आहात .खरे तर तुम्ही या नोकरीसाठी मिसफिट होतात असे असूनही बारा वर्षे ही नोकरी इमाने इतबारे केलीत आणि भांगेत उगवलेल्या तुळशीसारखे किंवा पाण्यात तरंगणाऱ्या लोण्यासारखे राहिलात याला कारण आपला स्वभाव आणि नियत. तेव्हा आपले कौतुक करावे तितके थोडेच आहे.
या पुस्तकाचा मला झालेला फायदा म्हणजे आता इथून पुढे एस्टीने प्रवास करतांना मी चालक - वाहकांना जरा "वेगळ्या" दृष्टीने निरखत जाईन.