Summary of the Book
एखाद्या अपराधाची किंवा गुन्ह्याची शिक्षा काय होऊ शकते, याची माहिती करून घ्यावयाची असेल, तर हे पुस्तक उपयुक्त ठरावे. तिसरा विभाग शिक्षांची माहिती देणारा आहे. सहाव्या विभागात देशविरोधी अपराध कोणते, त्या अपराधांबद्दल शिक्षा काय होते याची माहिती, तर सातव्या विभागात भूसेना, नौसेना आणि वायुसेना यासंबंधीच्या अपराधांना शिक्षा कोणती, ते समजते.
लोकसेवकांच्या कायदेशीर प्रधिकाराच्या अवमानांविषयी; तसेच खोटा पुरावा आणि सार्वजनिक न्यायाच्या विरोधी अपराधांविषयी माहितीही मिळते. बारावे प्रकरण हे नाणी व शासकीय मुद्रांक यासंबंधीचा मजकूर आहे. वजन, मापे यासंबंधीचे अपराध, आरोग्य, सभ्यता, धर्मासंबंधीचे अपराध, मालमत्ताविषयक, विवाहसंबधीचे, धाकदपटशा; तसेच अपराध करण्याच्या प्रयत्नाविषयीची शिक्षेची माहिती दिली आहे.